Jump to content

द न्यू यॉर्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

द न्यू यॉर्कर अमेरिकेतल्या न्यू यॉर्क शहरातून प्रसिद्ध होणारे एक सुप्रतिष्ठीत इंग्लिश साप्ताहिक आहे. १९२९ सालापासून प्रसिद्ध होत असणाऱ्याया नियतकालिकात चालू घडामोडींवर लेख तसेच ललित लेख, कथा, कविता, व्यंगचित्रे, निबंध, पुस्तक परिक्षणे, व नृत्य, नाटक, चित्रपटांची परिक्षणे असतात. छापलेल्या माहितीतील व संपादनाच्या निर्दोषतेबद्दल द न्यू यॉर्कर प्रसिद्ध आहे. या साप्ताहिकाने अमेरिकेच्या इंग्रजी साहित्याला मोठे योगदान केले आहे. कित्येक प्रसिद्ध अमेरिकन लेखक द न्यू यॉर्करमध्ये प्रथम प्रसिद्धीस आले. डेव्हिड रेमनिक याचे सध्याचे संपादक आहेत. वेद मेहतापंकज मिश्रा यांच्यासह अनेक भारतीय लेखकांनीही न्यू यॉर्करमध्ये लेख लिहिलेले आहेत.