दो बीघा जमीन
Jump to navigation
Jump to search
दो बीघा जमीन | |
---|---|
दिग्दर्शन | बिमल रॉय |
निर्मिती | बिमल रॉय |
कथा | सलील चौधरी |
प्रमुख कलाकार |
बलराज साहनी निरुपा रॉय |
संगीत | सलील चौधरी |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १९५३ |
दो बीघा जमीन हा १९५३ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. बिमल रॉय ह्यांनी दिग्दर्शन व निर्मिती केलेल्या ह्या चित्रपटामध्ये बलराज साहनी व निरुपा रॉय ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. समाजवादावर आधारित असलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर माफक यशस्वी झाला परंतु समांतर सिनेमाचे एक उत्तम उदाहरण मानल्या गेलेल्या दो बीघा जमीनला अनेक पुरस्कार मिळाले. सर्वोत्तम चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळवणारा हा पहिलाच चित्रपट होता. बिमल रॉयना सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार देखील मिळाला. कान चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा तो पहिलाच भारतीय चित्रपट होता.
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील दो बीघा जमीन चे पान (इंग्लिश मजकूर)