Jump to content

साडेतीन शक्तिपीठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्रात देवीची खालीलप्रमाणे साडेतीन शक्तिपीठे आहेत.

महालक्ष्मी

[संपादन]

महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे.

तुळजाभवानी

[संपादन]

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत असत.

रेणुका माता

[संपादन]
मुख्य लेख: रेणुका

रेणुका देवी ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ आहे. या देवीला 'एकवीरा', 'यमाई', 'येल्लुआई' तसेच 'येल्लम्मा' अशा विविध नावाने विविध प्रांतात संबोधले जाते. ही देवी आदिशक्तीचे प्रकट रूप महाकाली म्हणून पूजली जाते. रेणुका देवीला "साऱ्या जगाची आई" अर्थात "जगदंबा" मानतात.

सप्तशृंगी देवी

[संपादन]
मुख्य लेख: सप्तशृंगी देवी

नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवी महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]