दुर्गादेवीचा दुष्काळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दख्खनेत इ.स. १३९६-१४०७ अशा सलग बारा वर्षांमध्ये पडलेला दुष्काळ दुर्गादेवीचा दुष्काळ या नावाने ओळखला जातो[१]. या दुष्काळात महाराष्ट्र, कर्नाटक या दख्खनेतल्या प्रदेशांत राहणारे कित्येक लोक उपासमारीमुळे मेले, तर कित्येक अन्नान्नदशेमुळे स्थलांतरित झाले.

मदतकार्याचे उल्लेख[संपादन]

दुर्गादेवीच्या दुष्काळात बहामनी राज्यातील शिराळशेठ (किंवा श्रीयाळ श्रेष्ठी) नावाच्या एका व्यापाऱ्याने दुष्काळग्रस्तांसाठी बहुमोल काम केले [ संदर्भ हवा ]. उदार मदतकार्यामुळे शिराळशेठ आणि त्याच्या औदार्याची कीर्ती उत्तरकाळात आख्यायिकांच्या रूपाने व श्रावण शुद्ध षष्ठीस दरवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या श्रीयाळ षष्ठीच्या रूपात जनममानसात ठसली.

संदर्भ[संपादन]

  1. ^ मराठी विश्वकोश : "दुष्काळ" विषयावरची नोंद.