दादू पंथ
Appearance
दादू पंथ हा उत्तर भारतातील एक निर्गुणोपासक धर्मपंथ आहे. त्याला ब्रह्म संप्रदाय, परब्रह्म संप्रदाय किंवा सहज मार्ग अशीही नावे आहेत. दादू दयालने राजस्थानात सांभर येथे १५७३ मध्ये या पंथाची स्थापना केली, असे परशुराम चतुर्वेदी यांचे मत आहे. दादूला वयाच्या अकराव्या–बाराव्या वर्षी एका वृद्ध साधूने उपदेश दिला होता.
दादू पंथ हा कबीर पंथाचाच उपपंथ असल्याचे मानले जाते. वैष्णव संप्रदायातील हा एक सुधारणावादी पंथ असून त्याचे रामानंदी संप्रदायाशी पुष्कळ साम्य आढळते. वैष्णव संप्रदायातील हा एक सुधारणावादी पंथ असून त्याचे रामानंदी संप्रदायाशी पुष्कळ साम्य आढळते. या पंथाचा प्रवर्तक दादूदयाल (सुमारे १५४४–१६०३) हा होय.