द.ज. सरदेशपांडे
Appearance
(दादासाहेब सरदेशपांडे या पानावरून पुनर्निर्देशित)
द.ज. सरदेशपांडे | |
---|---|
चित्र:गुरूवर्य दत्तात्रय जगन्नाथ तथा दादासाहेब सरदेशपांडे.jpg | |
जन्म |
दत्तात्रय जगन्नाथ सरदेशपांडे |
निवासस्थान | राजापूर |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | दादासाहेब |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | शिक्षक |
प्रसिद्ध कामे | राजापूर या गावात राजापूर हायस्कूलची स्थापना आणि देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे एक संस्थापक |
मूळ गाव | कोंडगाव, साखरपा (रत्नागिरी जिल्हा) |
पुरस्कार | राष्ट्रपती पुरस्कार |
गुरुवर्य दत्तात्रय जगन्नाथ उर्फ दादासाहेब सरदेशपांडे हे महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांना भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. यांचे मूळ गाव हे संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव होते. परंतु ते राजापूर या गावात राहत असत.
शिक्षण क्षेत्रातील वाटा
[संपादन]राजापूर या गावातील शिक्षण क्षेत्रात यांचा मोलाचा वाटा होता. राजापूरमधील राजापूर हायस्कूल या विद्यालयाचे ते संस्थापक होते. तसेच देवरुख गावातील देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या स्थापनेत यांचा सहभाग होता.
यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राजापुरातील नाट्यगृहाला दादासाहेब सरदेशपांडे असे नाव देण्यात आले.