दया बाई
दया बाई (जन्म नाव मर्सी मॅथ्यू) या केरळमधील एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या मध्य भारतात राहणाऱ्या आदिवासींसाठी काम करतात. त्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील बारूल गावात राहतात.
प्रारंभिक जीवन
[संपादन]मर्सी मॅथ्यू १९४० मध्ये केरळच्या पाला येथील एका समृद्ध ख्रिश्चन कुटुंबात जन्मल्या. [१] यांचा देवावर दृढ विश्वास होता. त्यांचे बालपण आनंदी होते. [२]
समाजकार्य
[संपादन]त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी नन बनण्यासाठी पाल गाव सोडले. [३] नंतर मध्य भारतातील आदिवासी लोकांसाठी काम करण्यासाठी त्यांनी नन बनण्याचा विचार सोडून दिला. आदिवासींसाठी त्या प्रेरणादायी भाषणे देतात, सत्याग्रह करतात आणि स्थानिक अधिकाऱ्यांना शाळा उघडण्यासाठी दबाव आणतात. यामुळे मध्य प्रदेशातील दुर्लक्षित आदिवासी गावांना सक्षम बनवने शक्य होत आहे. बिहार, हरियाणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील वनवासी आणि ग्रामस्थांचे त्या प्रतिनिधित्व करतात. त्या नर्मदा बचाओ आंदोलन आणि चेंगरा आंदोलनाशी संबंधित होत्या. त्यांनी बांगलादेशातील युद्धाच्या वेळी तेथील सामान्य लोकांसाठीही आपली सेवा दिली होती. दयाबाई, ज्या मुक्तीच्या धर्मशास्त्राचा अभ्यास करतात, मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील गोंडांमध्ये स्थायिक झाल्या आहेत. त्यांनी बारूल गावात शाळा काढली. दयाबाई प्रत्येक गावाला भेट देतात आणि स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करून पुढच्या गावात जातात. [४]
त्यांनी गरिबी निर्मूलनाचे साधन म्हणून १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात स्वयं सहाय्यता समूह सुरू केला. यामुळे त्याणा मध्यस्थी, सावकार आणि गावप्रमुखांचा राग सहन करावा लागला. त्यांनी बँकेतील महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या पदाचा उपयोग गरीब आणि दुःखी गवकऱ्यांच्या उत्थानासाठी करण्यास सांगितले. [५]
पुरस्कार
[संपादन]दयाबाईंना २००७ मध्ये वनिता वुमन ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. [६] जानेवारी २०१२ मध्ये त्यांना गुड समेरिटन नॅशनल अवॉर्ड (कोट्टायम सोशल सर्व्हिस सोसायटी आणि अगापे मूव्हमेंट, शिकागो यांनी स्थापन केलेली संस्था) देऊन सन्मानित करण्यात आले. [७]
वारसा
[संपादन]ओटायल किंवा 'वन पर्सन' हा शायनी जेकब बेंजामिनचा दयाबाईवर एक तासांचा माहितीपट आहे. [४] चित्रपटसृष्टीत नावाजलेले व्यक्तिमत्त्व असलेल्या नंदिता दास यांनी २००५ मध्ये त्यांच्या जीवनाची प्रेरणा म्हणून त्यांना श्रद्धांजली लिहिली. [८]
चित्रपट
[संपादन]तिने कंठण - द लव्हर ऑफ कलर २०२१ या चित्रपटात मुख्य भूमिका केली.
संदर्भ
[संपादन]- ^ Suneetha, B. (2010-11-26). "Face of compassion". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2021-02-26 रोजी पाहिले.
- ^ "daya bai,lady of fire". 2018-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-14 रोजी पाहिले.
- ^ "Policies of Church contrary to Christ". 2018-06-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-14 रोजी पाहिले.
- ^ a b Face of compassion
- ^ "One-woman army drives financial inclusion in rural Madhya Pradesh". Vinson Kurian. The Hindu. 31 January 2012.
- ^ Kiran Bedi calls for change in education system[permanent dead link]
- ^ Good Samaritan National Award presented to Dayabai
- ^ "Mercy Mathew". 2018-03-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-14 रोजी पाहिले.
अधिक वाचन
[संपादन]- नायर, श्रीजय (२९ डिसेंबर २०१५). "हाऊ मर्सी बीकेम दया बाई". डेक्कन क्रॉनिकल. १८ सप्टेंबर २०१९ रोजी पुनर्प्राप्त.
बाह्य दुवे
[संपादन]- "दया बाई बद्दल माहितीपट" (इंग्रजी भाषेत). एम टीव्ही ऑर्थोडॉक्स टीव्ही. १८ सप्टेंबर २०१९ रोजी दाखिवला गेला.
- मृत बाह्य दुवे असणारे लेख from November 2022
- कायमचे मृत बाह्य दुवे असणारे लेख
- इ.स. १९४० मधील जन्म
- मल्याळम चित्रपट अभिनेत्री
- भारतीय महिला कार्यकर्त्या
- हयात व्यक्ती
- मल्याळी व्यक्ती
- सामाजिक कार्यकर्ते
- छिंदवाडा जिल्ह्यातील लोक
- पाला, केरळमधील लोक
- २०व्या शतकातील भारतीय महिला
- भारतीय महिला हक्क कार्यकर्ते
- भारतीय नन्स
- भारतीय शाळा आणि महाविद्यालयांचे संस्थापक
- भारतीय महिला परोपकारी
- भारतीय परोपकारी
- २०व्या शतकातील भारतीय शिक्षक
- केरळमधील कार्यकर्ते
- आदिवासी कार्यकर्ते
- मध्य प्रदेशातील कार्यकर्ते
- केरळमधील सामाजिक कार्यकर्ते
- मध्य प्रदेशातील सामाजिक कार्यकर्ते
- आदिवासी महिला
- २१व्या शतकातील भारतीय शिक्षक
- केरळमधील महिला शिक्षिका
- केरळमधील शिक्षक
- मध्य प्रदेशातील महिला शिक्षिका
- मध्य प्रदेशातील शिक्षक
- २०व्या शतकातील महिला शिक्षिका
- २१व्या शतकातील महिला शिक्षिका
- ख्रिश्चन व्यक्ती