दत्तू भोकनळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दत्तू बबन भोकनाळ
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव दत्तू बबन भोकनाळ
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ५ एप्रिल, १९९१ (1991-04-05) (वय: २८)
जन्मस्थान तळेगांव दाभाडे, महाराष्ट्र, भारत
खेळ
देश भारत
खेळ रोइंग
खेळांतर्गत प्रकार सिंगल स्कल्स
प्रशिक्षक कुसरत अली, इस्माइल बेग
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

दत्तू बबन भोकनळ (५ एप्रिल, १९९१) हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी रोइंगपटू आहे.

नाशिक जिल्ह्यातल्या तळेगांव या छोट्या गावात एका कामगार कुटुंबात दत्तू भोकनळचा जन्म झाला. वडिलांचे कर्करोगाने निधन झाल्याने कुटुंब पोसण्यासाठी दत्तू लष्करात भरती झाला. बीड जिल्ह्यात झालेल्या चाचण्यांत उत्तीर्ण होऊन तो लष्करात आला.

पुण्यातल्या खडकी येथील बॉंबे इंजिनिअरिंग ग्रुप या लष्कराच्या शाखेत काम करताना भोकनळने रोइंग मध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तेथील कुसरत अली हे त्याचे पहिले शिक्षक होते.. या खेळातील पुढील शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यातीलच आर्मी रोइंग नोडमध्ये बदलीवर गेला. तेथे रोइंगचे राष्ट्रीय कोच इस्माईल बेग यांनी त्याला मार्गदर्शन केले. भोकनळने २०१४ मधील राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत भाग घेऊन दोन सुवर्ण पदके जिंकली. त्याच वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले.

कारकीर्द[संपादन]

  • २०१४ मधील राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत दोन सुवर्ण पदके
  • २०१६ साली चीनमध्ये झालेल्या १६व्या आशियाई रोइंग स्पर्धेत दत्तू भोकनळने रौप्य पदक मिळवले.
  • दक्षिण कोरियातल्या चुंग जू येथील ‘फिसा एशियन ॲन्डओशॅनिक ऑलिंपिक क्वालिफिकेशन’ या नौकानयनाच्या स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी सामन्यात रौप्य पदक.
  • २०१६ सालच्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेण्याची संधी. भारताकडून रोइंगसाठी पात्र ठरलेला तो एकमेव खेळाडू होता.
  • २०१८ सालच्या इंडोनेशिया मध्ये भरलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंग क्वाड्रापल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघात दत्तूचा समावेश होता.

संदर्भ[संपादन]

[१]

  1. ^ ""गोल्डमॅन' दत्तूच्या  गावात दिवाळी". www.esakal.com (mr मजकूर). 2018-08-28 रोजी पाहिले.