थानोम कित्तिकाचोर्ण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

थानोम कित्तिकाचोर्ण (थाई: ถนอม กิตติขจร ; रोमन लिपी: Thanom Kittikachorn ; ) (ऑगस्ट ११, इ.स. १९११ - जून १६, इ.स. २००४) हा थायलंडाचा साम्यवाद-विरोधक लष्करी हुकुमशहा होता. इ.स. १९६३ ते इ.स. १९७३ या कालखंडात पंतप्रधान असलेल्या कित्तिकाचोर्णाने दशकभर लष्करी राजवट चालवली. अखेरीस जनक्षोभामुळे इ.स. १९७३ साली त्याला पायउतार व्हावे लागले. इ.स. १९७६ साली कित्तिकाचोर्ण अज्ञातवासातून मायदेशी परतल्यावर त्या विरोधातील निदर्शनांचा भडका उडाला. निदर्शनांच्या लाटांमुळे तंग बनलेल्या वातावरणात थायलंडात पुन्हा एकवार लष्कराने उठाव केला.

बाह्य दुवे[संपादन]