त्र्यंबक सीताराम कारखानीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

त्र्यंबक सीताराम कारखानीस ( महाड, १५ एप्रिल, १८७४) हे एक मराठी नाट्यदिग्दर्शक होते. ते महाराष्ट्र नाटक मंडळी या नाट्यसंस्थेचे संस्थापक होते. आपल्या नाट्यसंस्थेद्वारा कारखानीस यांनी गडकरी, देवल, खाडिलकर, औंधकर, खरे, आदी नामवंत नाटककारांची पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा विविध स्वरूपांची एकूण सोळा नाटके रंगभूमीवर आणली.


पहा : महाराष्ट्र नाटक मंडळी (नाट्यसंस्था); महाराष्ट्रातील नाट्यसंस्था