तुलसी गॅबार्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
तुलसी गॅबार्ड

तुलसी गॅबार्ड (जन्म: १२ एप्रिल १९८१, अमेरिकन सामोआ) ही अमेरिकेच्या हवाई राज्यातील एक राजकारणी व्यक्ती आहे. २०१२च्या निवडणुकांत गॅबार्ड यांनी हवाई बेटांतील दुसऱ्या काँग्रेशनल प्रभागातून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या सदस्यत्वाची निवडणूक जिंकली. त्या अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात एखादे पद धारण करणाऱ्या पहिल्या हिंदू व्यक्ती आहेत. तुलसी गॅबार्ड यांनी अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या(काँग्रेसच्या) इतिहासात भगवद्‌गीतेवर हात ठेवून पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. असे करणाऱ्या त्या पहिल्याच आहेत.[१] [२] यापूर्वी गॅबार्ड होनोलुलू महापालिकेच्या सदस्य होत्या. हवाई राज्याच्या प्रतिनिधिगृहात त्या वयाने सर्वांत लहान होत्या.

तुलसी गॅबार्ड या सध्या हवाई आर्मी नॅशनल गार्डमध्ये कंपनी कमांडर आहेत. ही कंपनी यापूर्वी ती दोन वेळा मध्यपूर्वेत सेवारत होती. याशिवाय गॅबार्ड या 'हेल्थी हवाई कोॲलिशन' या संस्थेच्या सहसंस्थापक आणि उपाध्यक्षही आहेत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]