तुरेबाज चंडोल
शास्त्रीय नाव | Galerida cristata |
---|---|
कुळ | चंडोलाद्य (Alaudidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | Crested Lark |
संस्कृत | शिखावंत चंडोल |
वर्णन
[संपादन]तुरेबाज चंडोल साधारण १८ सें. मी. आकाराचा पक्षी आहे. नर-मादी दिसायला सारखेच असतात, त्यांच्या पाठीकडून गडद बदामी-मातकट रंग त्यावर तुटक रेषा, पोटाकडून पांढरा रंग आणि पिवळसर रंगाचे पाय. इतर चंडोल प्रमाणेच नर तुरेबाज चंडोल उंच भरारी मारण्यासाठी आणि उडतांना गोड गाणी म्हणण्यासाठी प्रसिद्ध आहे. वीण काळात अनेक नर उंच उंच उडून स्पर्धा करतात.
वास्तव्य/आढळस्थान
[संपादन]खुले मैदानी प्रदेश, अर्ध वाळवंटी प्रदेश, कमी गवताळ भाग अशा प्रकारच्या प्रदेशात राजस्थान ते मध्य प्रदेश महाराष्ट्रसह दक्षिण भारत तसेच पश्चिम बंगाल, ओडिशा या भागात सर्वत्र राहणारा पक्षी तसेच चीन आणि आफ्रिकेतील काही तुरेबाज चंडोल पक्ष्याचे भागात वास्तव्य आहे.
खाद्य
[संपादन]गवताळ भागात, दगड-कपारीत असलेले विविध कीटक हे यांचे खाद्य आहे.
प्रजनन काळ
[संपादन]मार्च ते जून हा काळ तुरेबाज चंडोलचा प्रजनन काळ असून गवतातच साधे घरटे बांधले जाते. मादी एकावेळी ३ ते ४ फिकट पिवळी-पांढरी त्यावर जांभळी किंवा तपकिरी ठिपके असलेली अंडी देऊन एकटीच अंडी उबविते. मात्र पिलांना खाऊ घालण्याच्या कामात नर मादीला मदत करतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |