Jump to content

तिसगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तीसगाव या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?तिसगाव
Tisgaon
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१९° ११′ २०.४″ N, ७५° ०४′ ०८.४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर पाथर्डी
जिल्हा अहमदनगर
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४१४१०६
• +०२४२८
• MH 16
संकेतस्थळ: तीसगाव

तिसगाव हे पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. तिसगाव हे गाव नाशिक डिव्हिजन मध्ये येते. अहमदनगर पासून ४० कि.मी आहे. पाथर्डी पासून १२ कि.मी आहे. गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे.

हुसेन निजामशहा यांच्या काळात सलाबतखान बाबा यांनी तीस पेठा व भव्य तटबंदी करून तीस वेशींसह या गावाची निर्मिती १५५३ ते १५६५ दरम्यान केली. अहमदनगरच्या संरक्षणासाठी एक लष्करी ठाणे व व्यापारी केंद्र म्हणून हे गाव वसवले. "हुसेनाबाद" हे नाव हुसेन निजामशहा यांच्या नावावरून सलाबतखान बाबा यांनी त्यावेळी दिले होते. तीस वेशींमुळे पुढे त्यास तिसगाव म्हणले जाऊ लागले.