तिची भाकरी कोणी चोरली? बहुजन स्त्रीचं वर्तमान
तिची भाकरी कोणी चोरली? बहुजन स्त्रीचं वर्तमान हे पुस्तक - संध्या नरे - पवार लिखित असून यामध्ये दलित बहुजन स्त्रियांना स्वतःचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अस्तित्त्व निर्माण करताना कोणती आव्हाने समोर आली आणि त्या आव्हांना स्त्रिया कशाप्रकारे सामो-या गेल्या याचे कथन केलेले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मनोविकास प्रकाशन यांनी केले असून याची प्रथम आवृती २०१२ साली प्रसिद्ध झाली आहे.
या पुस्तकास महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती पुरस्कार मिळालेला आहे. एकूण सहा प्रकरणे या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. संध्या नरे - पवार यांनी या पुस्तकामध्ये स्त्रियांच्या मुलाखतींच्या आधारे मांडणी केलेली दिसून येते. स्त्रियांना रोजच्या जीवनामध्ये एक स्त्री मग ती विधवा, कुमारिका, विवाहित का असेना समाजामध्ये वावरताना तिला कशाप्रकाराचे संघर्ष वाट्याला येतात आणि त्या संघर्षाचा सामना करून त्या जेव्हा स्वतःचे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण करतात, त्यावेळी समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा कसा दृष्टीकोन कसा बदलला आहे हे ही त्या त्यांच्या कथनातून नोंदवतात.
पुस्तकात समाविष्ट असणारी प्रकरणे
[संपादन]- कष्टाच्या वाटेवर
- शाळा सुटली, पाटी फुटली
- तिच्या आरोग्याची दोरी
- अशांतीच्या भोव-यात, मनशांतीच्या शोधात
- जात सत्तेच्या तटाआड, पुरूषसत्तेच्या पहा-यात
- वेस ओलांडताना
चिकित्सात्मक मांडणी
[संपादन]विविध स्त्रीवादी लेखिकांनी तिची भाकरी कोणी चोरली? या पुस्तकाची चिकित्सात्मक मांडणी केलेली आहे.