तारवाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Wiretailed swallowed ,Chandigarh, India
Indian Wiretailed Swallow (Hirundo smithii filifera) (20506539142)

मराठी नाव[संपादन]

तारवाली, पाकोळी, भिंगरी, लिशरा.

इंग्रजी नाव[संपादन]

Wiretailed Swallow (वायरटेल्ड् स्वॅलो)

शास्त्रीय नाव[संपादन]

Hirundo Smithii (हिरंडो स्मिथी)

आकार[संपादन]

१४ सेंमी

माहिती[संपादन]

पाठीकडून चमकदार आणि पोटाकडून निळा पांढरा रंग असणारी हि पाकोळी चटकन ओळखण्याची खून म्हणजे निमुळती होत गेलेली, पण दुभंगलेली शेपटी. या पक्ष्याच्या शेपटीतून दोन तंतुसारखी पिसं बाहेर आलेली असतात म्हणून त्याला तारवाली असंही म्हणतात. मादीमध्ये या शेपटीतल्या तारा आखुड असतात. विजेच्या किंवा दुरबोलीच्या तारांवर ओळीनं बसलेल्या भिंगऱ्या उडते कीटक (मशकं) टिपतात. नद्या, तळी, झरे आणि शेतीच्या प्रदेशात भिंगऱ्या भिरभिरत असतात. सडपातळ पंखांमुळे पाकोळ्यांना अतिशय वेगात उडता येत. भातशेतीवरचे, गवतावरची किंवा पाण्यावरचे उडणारे किडे टिपत सतत त्यांच्या मागे हे पक्षी उडत राहतात. विणीचा हंगाम साधारण मार्च ते सप्टेंबर महिन्यात असतो. भिंगरीचं घरटं चिखलापासून बनवलेलं असतं. आपण चहा पितो ती बशी मधोमध फोडून भिंतीला चिकटवली तर जशी दिसेल तसं भिंगरीचं घरटं असत. अंडी उबवताना टोचू नये आणि पुढे अंड्यामधून बाहेर येणाऱ्या नाजूक त्वचा असणाऱ्या पिल्लांनाही त्रास होवू नये म्हणून घरट्याला आतल्या बाजूनं पिसं लावून "बिछाना" तयार केला जातो. असं घरटं पाण्याच्या टाकीच्या आत, खडकाच्या पोटात किंवा पुलांच्या कमानीखाली सापडतं. विजेच्या तारांवर उन्हाळा बसलेल्या भिंगऱ्या पहिल्या कि दुर्बीण डोळ्यांना लावावी. अशा वेळी कंबरेवर तांबूस पिसं असलेली लालबुडी भिंगरी (Redrumped Swallow) आणि तांबूस पिंगट गळा असलेली काडीवाली (Common Swallow) दिसते.

संदर्भ[संपादन]

दोस्ती करूया पक्ष्यांशी:श्री.किरण पुरंदरे.