ताम्हण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.

[[चित्|thumb|left|200px|महाराष्ट्र राज्यफुल ताम्हण]]

ताम्हण वृक्षाची फुले

ताम्हण (किंवा तामण, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही परिचित) (शास्त्रीय नाव : Lagerstroemia) हा सपुष्प वृक्ष आहे. याचे फूल महाराष्ट्राचे राज्यपुष्प आहे. ताम्हणाचे फूल लालसर-जांभळ्या रंगामुळे ओळखले जाते. मूळचे उपखंडातील असणारे हे फूल आपल्या लावण्यगुणांमुळे आता युरोप-अमेरिकेतही पोचले आहे [ संदर्भ हवा ]. भरपूर पाणी मिळणाऱ्या ठिकाणी ताम्हणाचे वृक्ष वाढतात. कोकणात या वृक्षाला 'मोठा बोंडारा' असे म्हणतात.

नावे[संपादन]

अन्य भाषांतील याची नावे पुढीलप्रमाणे आहेत. हिंदी - जरूल, अर्जुन बंगाली - जारूल, अजहार लेटीन - लेरस्ट्रीमिया फ्लासरेजिनी

परिसर[संपादन]

कोकणात सर्वत्र नदी-नाल्यांच्या काठांवर, बंगाल, आसाम, म्यानमार, दक्षिण भारत, अंदमान निकोबार आणि श्रीलंकेतील जंगलांमध्येही ते आढळतात. सर्वसाधारणपणे हा वृक्ष मध्यम आकाराचा, गोलसर, डेरेदार, पर्णसंभाराने शोभिवंत दिसतो

बहरण्याचा हंगाम[संपादन]

फेब्रुवारी-मार्च महिन्यात झाडाला बहर येऊन एप्रिल ते जून महिन्याच्या रखरखत्या ऊन्हातही हे फुल सर्वांचे लक्ष वेधून घेते.

फुलाचे वैशिष्ट्य[संपादन]

हे फूल पूर्ण उमलल्यावर सहा-सात सेंटिमीटर व्यासाचे होते. झालरीसारखी दुमड असणाऱ्या सहा किंवा सात नाजूक, तलम चुणीदार पाकळ्या हे या फुलाचे वैशिष्ट्य. फुलातील रंगसंगती अप्रतिम असते. शांत, शीतल, प्रसन्न रंगाच्या पाकळ्या, त्यांच्या मध्यभागी विरुद्ध रंगाचे (काँट्रास्ट कलर) पिवळेधमक नाजूक पुंकेसर, पुंकेसरांची संख्या अनिश्‍चित पण २० पेक्षा जास्त असते. फुलांची रंगछटा जमीन, पाणी हवामान अशा घटकांनुसार बदलू शकते

झाडाची संरचना[संपादन]

खोडा-फांद्यांची साल पिवळसर, करड्या रंगाची, गुळगुळीत असते. पेरूच्या झाडाच्या सालीसारखी ती दिसते. सालीचे पातळ, अनियमित आकाराचे पापुद्रे निघून गळून पडतात. त्या ठिकाणी फिकट रंगाचे चट्टे पडतात. पाने संमुख, साधी, मोठी, लांबट, लंबगोल; पण टोकदार असतात. ती वरच्या बाजूने गडद हिरवीगार; तर खालून फिकट हिरवी दिसतात. हिवाळ्यात पानगळ होताना ती तांबट रंगाची होतात. झाडाचे हे रूपही अत्यंत मनोहारी असते. वसंत ऋतूची चाहूल लागताच नवीन पालवी फुटू लागते. साधारणपणे पालवीबरोबर किंवा आगेमागे फुलांचा बहर सुरू होतो. २५-३० सेंटिमीटर लांबीचे फुलोरे फांद्यांच्या शेंड्यांजवळ येऊ लागतात. फुले खालून वर टोकाकडे उमलत जाणारी जांभळ्या रंगाची; अतिशय देखणी दिसतात.

उपयोग[संपादन]

याचे लाकूड मजबूत, टिकाऊ आणि चमकदार, लालसर रंगाचे असते. हे लाकूड उपयोगाच्या आणि टिकाऊपणाच्या बाबतीत सागवानाशी स्पर्धा करणारे असते. त्याचा वापर इमारती, पूल आणि विहिरीचे बांधकाम, जहाजबांधणी, रेल्वे वॅगन; तसेच विविध प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी होतो. ताप आल्यास याच्या सालीचा काढा दिला जातो.