तपकिरी डोक्याची केगो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तपकिरी डोक्याची केगो

तपकिरी डोक्याची केगो, धोबा, सरोता, कंबवली, केगो, कीर किंवा कुरव (इंग्लिश:browonheaded gull) हा एक तपकिरी डोक्याचा पक्षी आहे.

आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा. वरून राखी खालून पांढरा. उन्हाळ्यात त्याच्या डोक्याच रंग कॉफिसारखा तपकिरी दिसतो.थंडीत ते जेव्हा भारतात असतात, तेव्हा डोके राखट सफेद रंगाचे असते. पंखाची टोके काळी त्यावर आरश्यासारखा पांढरा डाग चोच व पाय लाल. कानाला कठोर वाटणारा गेक गेक असा आवाज. का-येक ,का-येक असे मोठ्या आवाजात आक्रंदन.

वितरण[संपादन]

भारताच्या पश्चिमपूर्व समुद्रकिनाऱ्यावर आढळतात. क्वचितच समुद्रापासून दूर अश्या नद्या व सरोवरांतही आढळतात.

निवासस्थाने[संपादन]

समुद्रकिनारे, नद्या आणि सरोवरे.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली