तन्वीर सन्मान
तन्वीर सन्मान हा पुरस्कार २००४ सालापासून, डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू यांच्या दिवंगत मुलाच्या नावाने रूपवेध या संस्थेतर्फे दिला जातो.
पुरस्काराचे स्वरूप
[संपादन]एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असून २०१४ साली कोणत्याही व्यक्तीला तन्वीर सन्मान दिला गेला नाही. त्याऐवजी रूपवेध प्रतिष्ठानतर्फे ’बिनकामाचे संवाद’ नावाच्या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला. हे नाटक करणाऱ्या ’नाटक कंपनी’ या नाट्यसंस्थेस एक लाख आणि तीस हजार रुपये देण्यात येणार आहेत.
सन्मानप्राप्त नाट्यकर्मी
[संपादन]- डिसेंबर ९ इ.स. २००४ रोजी हा पुरस्कार इब्राहिम अल्काझी यांना प्रदान झाला.
- डिसेंबर ९ इ.स. २००५ रोजी हा पुरस्कार भालचंद्र पेंढारकर यांना प्रदान झाला..
- डिसेंबर ९ इ.स. २००८ या दिवशी पं. सत्यदेव दुबे यांना प्रदान झाला..
- डिसेंबर ९ इ.स. २०१० रोजी हा पुरस्कार सुलभा देशपांडे यांना प्रदान झाला..
- ९ डिसेंबर २०१२ रोजी हा पुरस्कार गिरीश कर्नाड यांना देण्यात आला. हा नववा तन्वीर पुरस्कार होता.
- ९ डिसेंबर २०१३ या दिवशी हा पुरस्कार कै. गो.पु. देशपांडे यांना देण्यात आला. हा मरणोत्तर पुरस्कार होता.
- २०१४ साली या पुरस्काराची रक्कम ’बिनकामाचे संवाद’ या नाटकाला देण्यात आली.
- ९ डिसेंबर २०१५ रोजी हा पुरस्कार द थिएटर ग्रुपचे अलेक पदमसी यांना देण्यात आला..
यांव्यतिरिक्त विजय तेंडुलकर, कवलम नारायण पणिक्कर आणि विजया मेहता यांना हा सन्मान मिळाला आहे.
- ९ डिसेंबर २०१६ रोजी हा पुरस्कार कांचन सोनटक्के आणि त्यांच्या नाट्यशाळा ट्रस्टला प्रदान होईल..
या शिवाय संस्थेतर्फे २००५सालापासून 'तन्वीर रंगधर्मी' (तन्वीर नाट्यधर्मी) हा पुरस्कारही दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ३० हजार असे आहे.
- डिसेंबर ९ इ.स. २००५ रोजी हा पुरस्कार चेतन दातार यांना प्रदान झाला..
- डिसेंबर ९ इ.स. २००८ रोजी हा पुरस्कार अभिनेता गजानन परांजपे यांना प्रदान झाला..
- डिसेंबर ९ इ.स. २०१० रोजी हा पुरस्कार वीणा जामकर यांना प्रदान झाला..
- डिसेंबर ९ इ.स. २०१२ रोजी हा पुरस्कार नाट्य संहिता लेखन, दिग्दर्शन, संगीत दिगदर्शन आणि अभिनय या सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रदीप वैद्य यांना प्रदान झाला..
- डिसेंबर ९ इ.स. २०१३ रोजी हा पुरस्कार नाट्य निर्माते वामन पंडित यांना प्रदान झाला.
- ९ डिसेंबर २०१५ रोजी हा पुरस्कार नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांना मिळाला..
- डिसेंबर २०१९ रोजी हा पुरस्कार नसीरुद्दीन शहा यांना मिळाला.
यांव्यतिरिक्त हा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार, गजानन परांजपे, संजना कपूर, रामू रामनाथन आणि राजेंद्र चव्हाण यांना मिळाला आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |