डोरोथी क्रोफूट हॉजकिन
Appearance
डोरोथी क्रोफूट हॉजकिन | |
---|---|
डोरोथी मेरी क्रोफूट हॉजकिन (१२ मे, १९१०:कैरो, इजिप्त - २९ जुलै, १९९४:इल्मिंग्टन, वॉरविकशायर, इंग्लंड) या नोबेल पारितोषिक विजेत्या ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ होत्या. त्यांनी प्रोटीन क्रिस्टलोग्राफीचे तंत्र विकसित करून त्याद्वारे पेनिसिलिन आणि व्हिटामिन ब१२च्या अणूरचनेबद्दलचे अंदाज शाबित केले. यासाठी त्यांना १९६४ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर आणि गाय डॉड्सनचा समावेश आहे.