डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढा
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांन बाबतीतला लढा- अवर्णनीय कार्य.
असे म्हणतात कि प्रत्येक यशश्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो , परंतु स्वतंत्र भारताच्या संपूर्ण स्त्रियांच्या प्रगती मागे फक्त एकच महापुरुषाचा हात आहे , आणि ते म्हणजे बोधिसत्व डॉ . बाबासाहेब आंबेडकर…….
काय केलं बाबासाहेबांनी आमच्या साठी असा विचार करत बसण्यापेक्षा एकदा काही प्रश्नची उत्तरे शोधावीत असं मला वाटत. यातील बऱ्याच प्रश्नाची उत्तरे मुनुस्मृती मधून भेटतील. तर त्या सोबत आपल्या काही अधिकारांचा आणि हक्कांचा उलगडा होईल व त्यासोबत सोबत गुलामी खाली आयुष्य जगणं काय असते याची जाणीव देखील होईल.
मला पडलेले प्रश्न
१) दिवसाचे ७ तास कामगारांना मंजूर केले नसते तर ?
२) महिलांना डिलिव्हरी सुट्ट्या संविधानात नमूद केल्या नसत्या तर मग ती कुठल्याही जाती धर्माची असो ?
३) महिलांना व पुरुषांना सामान अधिकार नसते दिले तर ?
४) चूल आणि मूल, सतीप्रथा ,या प्रथा सर्व पायधुळी मिळाल्या नसत्या तर ?
५) मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला नसता तर ?
६) स्त्रियाना वारसा हक्क नसता तर ?
७) पोटगी मागण्याचा अधिकार नसता तर ?
८) पुनर्विवाह करण्याचा अधिकार नसता तर ?
९) घटस्फोट घेण्याचा अधिकार नसता तर ?
१०) स्त्रियांना स्वतंत्र मिळाले नसते तर ?
११) मतदानाचा अधिकार मिळालाच नसता तर ?
१२) आपल्याला शाळेत बसून शिक्षण घेण्याचा अधिकार नसता तर?
१३) जे पाणी म्हणजे जीवन म्हणतो ,तेच स्वच्छ पिण्याचा अधिकार नसता तर?
भारतातील प्रमुख महात्मे, स्त्रीवादी नेते ,समाजसुधारक यांची जर का आपण नावे घेतली ,तर पहिलं नाव त्यात डॉ. बाबासाहेबांचे नाव येईलच. कारण बाबासाहेबांना 'दलित नेते ' म्हंणूनच 'लेबल ' केले आहे पण ते फक्त दलितांचे नव्हे तर समाजातील प्रत्येक जातीतील गरीब सामान्य जनतेचे नेते होते. पण फक्त दलित नेते या अशा लेबलिंग मुळे काय होत की , बाबासाहेबांनी , प्रत्येक नागरिक ; मग तो कोणत्याही जाती -धर्माचा असो , त्याला आपल्या महान कार्यामुळे लाभच झाला आहे , हे कार्यच आपण अमान्य केल्यासारखे होते , खरेतर प्रत्येक नागरिक आज बाबासाहेबांचा ऋणी आहे . हे न फिटणारे कर्ज आहे . समानतेचा , सक्षमतेचा सर्वाना दिला . गेल्या महिन्यात आंतरराट्रीय दिन झाला ..स्त्रियांचे सक्षमीकरण हा म्हंटले तर महत्त्वाचा व कदाचित म्हणूनच चावून चोथा झालेला विषय ! क्वचीत हास्याचा पण ! खरे तर , स्त्री , मग ती कोणत्याही जाती धर्माची असो , सवर्ण ,उच्च जाती मधील स्त्रीसुद्धा शूद्रच होती .मुळातच समाजातील सर्वप्रकारच्या विषमता , अन्यायाविरोधात बाबासाहेबांबानी प्रचन्ड प्रमाणात त्याचा अभ्यास , चिंतन, लिखाण व कार्य केले.
त्यांचा विरोध हा विषमतेला, अन्यायाला होता कोणत्याही एका जाती - धर्माला नव्हता , म्हणूनच बाबासाहेब सर्व जाती -धर्मातील विषमता नष्ट करून समानता प्रस्तापित करणारे महान नेते होते ! ही विषमता कोठून येते ? ती नष्ट करण्यासाठी जे उपाय ,कृती करावी लगेल ते म्हणजे सक्षमीकरण ! शिक्षण ,आरोग्य ,अनिष्ठरूढी ,परमपरा व त्यातून येणारी हे सर्व घटक बाबासाहेबांनी बारकाईने अभ्यासले . अनेक समाजसुधारकानीं स्त्रियांच्या उन्नतीचे केले .बाबासाहेबांनी त्याचाच वारसा भक्कमपणे चालवत ,दूरदृष्टींने ते कार्य नुसते पुढेच नेले नाही ,तर त्याला घटनेचे कायद्याचे कवचही दिले , जेणेकरून पुढीचे अनेक पिढ्यामधील स्त्रियांना याचा लाभ मिळेल .
आज स्वतंत्र भारतात कित्येक अधिकार महिलांना बाबासाहेबांमुळे मिळाले आहेत .या अधिकारांना आपण गृहीत धरतो व हे सर्व ज्यांच्या प्रयत्नामुळे मिळाले आहेत .त्या त्यांना आपण लेबल लावतो . या अधिकारामुळे महिलांना हक्क , प्रतिष्ठा ,दर्जा प्राप्त झाला कारण समाजात स्त्री -पुरुष दोन्ही घटक मह्त्वाचे आहेत ,एक घटक विषम असेल तर तो समाज प्रगती कसा करू शकेल ? हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती या प्रदीर्घ निबंधात बाबासाहेबांनी धार्मिक अंध:पतनावर चर्चा केली आहे . न स्त्री स्वतंत्र्याम अर्हती हे सांगितलेल्या स्त्रियांबद्दल अतिशय नीच पातळीवरील ,अपमानास्पद वर्णन करणारी मनुस्मृती जाहीरपणे जाळून बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामाच केला ! (सध्या निवडणुकीच्या वाऱ्यात मात्र सत्ताधारी पक्ष्याच्या जाहीरनाम्यात स्त्री बद्दल काहीही नाही !)
महाड येथे झालेल्या तीन दिवशीय परिषदेमध्ये पण बाबासाहेबांनी तिसऱ्या दिवशी स्त्रियांना उद्देशून भाषण केले . स्त्रियांनी आपले राहणीमान कसे सुधारावे , दारू पिऊन येणारा नवरा , भाऊ , बाप ई. पुरुषान साठी दार उघडू नका असे त्यांनी सांगितले ! केवढा हा मोठा सल्ला ! दारूने संसाराची कशी राख , रांगोळी होती हे त्यांनी जाणले होते ,
आज आपण हे करू शकतो का ?
फक्त स्त्री मुक्ती स्त्री स्वातीनंतर असे म्हणून चालत नाही . त्यासाठी ठोस कृती करावी लागते . व ते बाबासाहेबांनी केले . स्वतंत्र, समता व बंधुता ही त्रिसूत्रे त्यांच्या चिकित्सेचा पाया होती .यासाठी त्यांनी इतिहासचा अभ्यास केला व स्त्री चे स्थान काय होते हे तपासले . आज आपण राजकारण , खेळ ,चित्रपट नौकऱ्या , कालश्रेत्र ई . सर्व ठिकाणी महिला बघतो हा अधिकर त्यांना कलम १५,१६ ने दिलेला आहे .
जातीअंतासाठी स्त्रियांनीच पुढाकार घ्यावा असे महाड सत्याग्रह परिषदेत त्यांनी जाहीर सांगितले . विधवा विवाह ,आंतरजातीय विवाह हे व्हायला हवेत व त्याची गरज त्यांनी स्पष्ट्पणे मंडळी .आज मुली शिकतात ,नौकऱ्या करतात ,अर्थार्जन करतात हे केवळ बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्यामुळेच : सर्व जाती -धर्मातल्या स्त्रियांनी बाबासाहेबांनाच आपला उद्धार करता मानलेच पाहिजे .
रमाबाईना पण त्यांनी चळवळीत येण्यास प्रोत्साहन दिले . यामुळे नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश व महाड सत्याग्रहामध्ये महिलांची संख्या मोठी होती .
भारतातील सर्व जाती धर्मातील स्त्रियांना जाचक रूढी आणि परंपरा पासून सुटका मिळावी यासाठी अथक प्रयत्न बाबासाहेबांनी केले .यात इतिहास कालीन स्त्रियांची परिस्तिथीचा अभ्यास ,चिंतन,विविध लेख ,पुस्तके मधून लिखाण ,विविध आंदोलनामधून कार्य त्यांनी केले .एवढे सगळे करून बाबासाहेब थांबले नाहीत . या सगळ्याला एका कायद्यात बसवले तर ते अगदी सक्षमपणे महिलांना अधिकार मिळेल हे त्यांच्या मनाने घेतले यासाठी त्यांनी अत्यंत कठोर मेहनत घेऊन ,सर्व बारकावे तपासून , भविष्यातील वेध घेऊन "हिंदू कोड बिल "चा मसुदा लिहिला ज्याला तब्बल ४ वर्ष , १महिना व २६ दिवस लागले.
स्त्रियांच्या कल्याणासाठी ,त्यांना सर्व अधिकार कायद्याने देण्यासाठी एवढे परिश्रम !
बाबासाहेब हे केवळ बोलते सुधारक नाहीत तर कर्ते सुधारक होते. कायद्याचे कवच असल्यावर स्त्रियांना हक्क मिळतीलच हा केवढा मोठा दृष्टीकोन या कोड बिलामुळे स्त्रियांना वारसा हक्क , पोडगी , घटस्फोट घेण्याचे स्वतंत्र ,विवाह अधिनियम,पुनर्विवाह अधिकार ई . महत्त्वपूर्ण गोष्टी मिळाल्या .
स्त्रियांचा सर्व पातळीवर सामाजिक , वैवाहिक आर्थिक पातळीवर ईतका सखोलपणे विचार करून त्यांना सर्वस्तरामध्ये सक्षम स्वतंत्र करणे हे बाबासाहेबांचं जाणत.
तत्कालीन सरकार मात्र हा महान ,सर्व समावेषक दृष्टीकोन समजून घेण्यास पात्र नसल्याने मात्र निषेद म्हणून भारताच्या पहिल्या कायदेमंत्र्यांनी , डॉ . बाबासाहेबांची मात्र तत्त्वनिष्ट पणे मंत्रिपदाचा जाहीरनामा दिला .आज ही ही मनोवृत्ती बदलेली आपणास दिसत नाही. याशिवाय सामान कामासाठी , सामान पगार असलाच पाहिजे (स्त्रीने - पुरुषांना ) , महिला स्वरक्षण कायदा ,डिलिव्हरी सुट्ट्या पालकत्वाचा अधिकार , मालमतेचा अधिकार मिळवूण देणारे आंबेडकर "The one and only one " आहेत.