डॉना स्ट्रिकलँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉना थिओ स्ट्रिकलॅंड (२७ मे, १९५९:गुलेफ, ऑन्टॅरियो, कॅनडा - ) या केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ आहेत. पल्स लेसर[मराठी शब्द सुचवा] वरील संशोधनासाठी त्यांना २०१८ सालचे भौतिकशास्त्रामधील नोबेल पारितोषिक देण्यात आले. मेरी क्युरी आणि मरिया गेपर्ट-मायर नंतर भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या त्या तिसऱ्या महिला आहेत.

त्यांचे पती डग्लस आर. डिकार हे सुद्धा लेसर संशोधक आहेत. त्यांना ॲडम आणि हॅना ही दोन मुले आहेत.