डीआरडीओ रुस्तम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

'रुस्तम' ही भारतनिर्मित मानवविरहित विमानशृंखला आहे. भारताच्या रक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) याचे निर्माण केले आहे. रुस्तम-१ हे विमान आधी बनवले गेले. यात टेहळणी करण्याची क्षमता होती. नंतर २०१६ मध्ये बनवलेले तापस-२०१ पुर्वीचे नाव (रुस्तम-२) मानवरहित विमान आहे. भारताच्या रक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) ‘रुस्तम २’ नावाने देशी बनावटीचे दोन टन वजनाचे ड्रोन विमान विकसित केले आहे.

क्षमता[संपादन]

तापस-२०१ यात स्फोटके नेण्याची आणि स्फोट घडवून आणण्याची क्षमता आहे. सिंथेटिक अपर्चर रडार असल्याने हे ड्रोन ढगांच्या पलिकडे पाहू शकतात. हे विमान ३० हजार फूटाच्या उंचीवरून उडू शकते. या मानव विरहीत विमानाचे पंख २१ मीटर लांब आहेत. रुस्तम-२ सलग २४ तास उडू शकते. याचा वेग ५०० किमी प्रति तास आहे. यामध्ये दिवसा व रात्रीही उडू शकण्याची क्षमता आहे. तीस हजार फुटांवर ऊडत असल्याने हे A medium-altitude long-endurance UAV (MALE UAV)[मराठी शब्द सुचवा](मध्यम-उन्नतन दीर्घ-सोशिकता माउवा(मानवरहित उड्डाण वाहन) प्रकारात गणले जाते.

चाचणी[संपादन]

तापस-२०१ (रुस्तम-२) या विमानाचे उड्डाण नोव्हेंबर २०१६ मध्ये यशस्वी झाले आहे. बंगलोरपासून साधारण २५० किमीवर असलेल्या चित्रदुर्ग येथील एरॉनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये ही चाचणी घेतली गेली होती.

इतर विमाने[संपादन]

यापूर्वी भारताकडे रुस्तम-१ तसेच औरा ही मानवविरहीत विमाने कार्यरत आहेत.