Jump to content

डिंपल यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डिम्पल यादव या पानावरून पुनर्निर्देशित)
डिंपल यादव

जन्म इ.स. १९७८
पुणे, महाराष्ट्र, भारत
राजकीय पक्ष समाजवादी पक्ष
पती अखिलेश यादव
अपत्ये ३ (अदिती, अर्जुन, टिना)
व्यवसाय राजकारणी
धर्म हिंदू

डिंपल यादव या उत्तर प्रदेश राज्यामधील एक महिला राजकारणी आहेत. त्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी तसेच समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांच्या स्नुषा आहेत. मुलायम सिंग यादव यांच्या घराण्यातील सक्रिय राजकरणात कार्यरत असणाऱ्या त्या सहाव्या व्यक्ती आहेत.

राजकीय कारकीर्द

[संपादन]

२००९ मध्ये फिरोझाबाद लोकसभा मतदारसंघातून राज बब्बर यांच्या विरोधात फेरनिवडणूक निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.[] २००९ च्या केंद्रिय सार्वत्रिक निवडणुकीत डिंपलचे पती अखिलेश यादव यांनी फिरोझाबाद लोकसभेची जागा ६७,३०१ मतांनी जिंकली होती. त्यांनी त्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचे नेते एस्.पी.एस्. बाघेल यांचा पराभव केला. अखिलेश यादव यांनी कनौज लोकसभा मतदार संघातूनही निवडणूक लढवली आणि त्यांनी दोन्ही जागा जिंकल्या. त्यामुळे फिरोझाबाद मतदारसंघामध्ये फेरनिवडणूक झाली.[] राजकारणातील प्रवेशापूर्वी आणि निवडणुकीतील पराभवापूर्वी, बेहिशोबी मालमत्तेच्या खटल्यात इतर यादव कुटुंबीयांसोबत तीचे नाव चुकिच्या कारणांसाठी पुढे आले.[] [] २०१२ मध्ये अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद स्विकारल्यानंतर रिक्त झालेल्या कनौज लोकसभा मतदार संघातून डिंपल बिनविरोध निवडून आल्या.

फेरनिवडणुकित बिनविरोध निवड झालेल्या डिंपल या उत्तर प्रदेश मधील पहिल्या महिला खासदार आहेत. १९५२ मध्ये अलाहबाद पश्चिम मतदार संघातून पुरुषोत्तम दास टंडंन यांच्या बिनविरोध फेरनिवडणुकीनंतर बिनविरोध निवडून लोकसभेत जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील त्या दुसऱ्या खासदार आहेत. भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्षकाँग्रेस ह्या उत्तर प्रदेशामधील तिन्ही प्रमुख पक्षांनी डिंपलविरूद्ध उमेदवार उभा केला नाही. निवडणुकीपूर्वी दशरथ सिंग संकवार (संयुक्त समाजवादी दल) आणि संजू कटियार (अपक्ष) यांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतले. उत्तर प्रदेशच्या इतिहासात पुरुषोत्तम दास टंडंन आणि १९६२ मध्ये राजा मानवेंद्र सिंग यांच्या टेहरी मतदार संघातून बिनविरोध निवडीनंतर डिंपल यादव ह्या तिसऱ्या उमेदवार आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Roy, Rustam (6 November 2009). "I am not fighting for family but for party's honour: Mulayam's bahu Dimple Yadav". Times of India. 7 March 2010 रोजी पाहिले.
  2. ^ Pradhan, Sharat (12 November 2009). "Analysis: Why Dimple Yadav came a cropper in UP bypoll". Rediff. 7 March 2010 रोजी पाहिले.
  3. ^ SARIN, RITU (14 December 2008). "Law Minister at the wheel in CBI's U-turn on Mulayam case". इंडियन एक्सप्रेस. 7 March 2010 रोजी पाहिले. Unknown parameter |coauthors= ignored (|author= suggested) (सहाय्य)
  4. ^ "Probe UP CM's money: SC to CBI". CNN-IBN. 1 March 2007. 2012-03-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 March 2010 रोजी पाहिले.