ठिपक्यांचा वृक्षसर्पी (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ठिपक्यांचा वृक्षसर्पी (इंग्लिश:Indian Spotted Grey creeper) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो.विविध रंगांचे ठिपके असलेला,तसेच,बाकदार लांब चोच असलेला तपकिरी रंगाचा हा पक्षी असतो.त्यचा वरील भागाचा रंग गर्द तपकिरी असून त्यावर पांढरे ठिपके असतात.त्याची भुवई पांढरी व कानाभोवतिच्या भागाचा रंग गर्द असतो. शेपटीवर तपकिरी आणि पांढरे पट्टे असतात.त्याचा कंठ पांढरा असतो व खालील भागाचा रंग तांबूस व त्यावर गर्द तपकिरी रंगाचे ठिपके व पट्टे असतात.नरमादी दिसायला सारखेच असतात.

वितरण[संपादन]

मध्य भारतात गुरगाव(दिल्लीजवळ),गोंडा(उत्तर प्रदेश),बिहार तराई,गुजरात या देशात हा पक्षी पाहायला मिळतो.

निवासस्थाने[संपादन]

पानगळीची विरळ जंगले या भागात हा पक्षी आढळून येतो.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली