बेलीझ जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेलीझ जिल्हा बेलीझ देशातील सहापैकी एक जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बेलीझ सिटी येथे आहे.

देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक व्यक्ती राहतात. या जिल्ह्यात ॲम्बरग्रिस केय, केय कॉकनर आणि इतर अनेक द्वीपांचाही समावेश होतो. बेलीझच्या प्रतिनिधीगृहातील ३१ पैकी १३ मतदारसंघ या जिल्ह्यात आहेत. पैकी १० मतदारसंघ बेलीझ सिटी शहरात आणि इतर तीन ग्रामीण भागात आहेत.