Jump to content

टेसी थॉमस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Tessy Thomas; ટેસી થોમસ; Tessy Thomas; Tessy Thomas; Tessy Thomas; Tessy Thomas; Tessy Thomas; تسی توماس; Tessy Thomas; Tessy Thomas; ٹیسی تھامس; Tessy Thomas; Tessy Thomas; ಟಿಸ್ಸಿ ಥಾಮಸ್; टेसी थॉमस; ᱴᱮᱥᱤ ᱛᱷᱚᱢᱟᱥ; ਟੇਸੀ ਥਾਮਸ; টেছি থমাছ; டெஸ்ஸி தாமஸ்; टेसी थॉमस; টেসি থমাস; Tessy Thomas; टेसी थॉमस; ଟେସୀ ଥୋମସ; Tessy Thomas; Tessy Thomas; Tessy Thomas; U-Tessy Thomas; Tessy Thomas; Tessy Thomas; टेसी थोमस; Tessy Thomas; Tessy Thomas; ടെസ്സി തോമസ്; Tessy Thomas; Tessy Thomas; تيسى ثوماس; ಟಿಸ್ಸಿ ಥಾಮಸ್; Tessy Thomas; Tessy Thomas; Tessy Thomas; Tessi Tomas; టెస్సీ థామస్; científica india; ভারতীয় বিজ্ঞানী; ingénieure indienne; ભારતમાં મિસાઈલ પ્રોજેક્ટનું નેતૃત્વ કરનાર પ્રથમ મહિલા; Indiar zientzialaria; científica india; Indian scientist; indische Wissenschaftlerin und Raumfahrtmanagerin; ଭାରତୀୟ ବ scientist ଜ୍ଞାନିକ; eolaí Indiach; Usosayensi waseNdiya; India karimma ŋun nyɛ paɣa; Hint bilim insanı; Indian scientist; Indian scientist; Indiaas ruimteingenieur; indisk vetenskapsman; indyjska naukowczyni; ഇന്ത്യൻ ശാസ്ത്രജ്ഞ; onye ọka mmụta sayensị si India; ಭಾರತೀಯ ವಿಜ್ಞಾನಿ; भारतीय वैज्ञानिक (जन्म: 1963); భారతీయ శాస్త్రవేత్త; Hind olimi; Indian scientist; عالمة هندية; scienziata indiana; இந்திய விஞ்ஞானி; Tessy Thomas; டெசி தாமசு
टेसी थॉमस 
Indian scientist
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखएप्रिल, इ.स. १९६३
अलप्पुळा
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९८८
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
  • शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, त्रिशूर
व्यवसाय
पुरस्कार
  • लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार (इ.स. २०१२)
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

टेसी थॉमस (जन्म-एप्रिल १९६३) या भारतीय शास्त्रज्ञ संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, भारत येथे अग्नी-४ क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या संचालिका असून या पदावरील त्या पहिल्या महिला आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३५०० किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. त्यांना भारताची 'मिसाइल वुमन' म्हणून ओळखले जाते.ह्या अग्नी -४ क्षेपणास्त्राने नऊशे किलोमीटरची उंची गाठली आणि नंतर ते बंगालच्या उपसागरातील ३,००० किलोमीटर अंतरावरील नियोजित लक्ष्यावर जाऊन आदळले.[][]

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

थॉमस यांचा जन्म एप्रिल १९६३ मध्ये केरळमधील अलाप्पुझा येथे सीरियन ख्रिश्चन कुटुंबात झाला.त्यांना मदर टेरेसा (टेरेस किंवा टेरेसियाचे) म्हणून नाव देण्यात आले.त्यांचे वडील एक आयएफएस अधिकारी तसेच एक उद्योगपती आणि एक अकाऊंट म्हणून काम करत होते.जेव्हा थॉमस १३ वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांचे वडील पक्षाघाताने त्रस्त होते. त्यामुळे त्यांचा उजवा हात काम करत नसे. त्यांची आई शिक्षिका होती आणि अशा परिस्थितीत कुटुंबाची देखभाल करण्यासाठी जबाबदारी त्यांच्यावर आली. त्या थुंबा रॉकेट लॉचिंग स्टेशनजवळ मोठी झाली.तिला रॉकेट व मिसाईल याचा मोह तिला आला.विमानाच्या उद्रेकामुळे तिलाही उत्तेजन मिळाले. थॉमसला चार बहिणी आणि एक भाऊ आहे.एका मुलाखतींमध्ये तिने तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी मुलांचे योग्य शिक्षण मिळावे .याबद्दल मुलाखत दिली. तिच्या दोन बहिणीने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.तर भावाने एमबीए करीत आहे.[]

शिक्षण

[संपादन]

टेसी थॉमस यांनी त्यांचे शालेय शिक्षण एसटी.मायकल या शाळेत पूर्ण केले.आणि उच्च माध्यमिक म्हणजेच ११ वी व १२ वीचे शिक्षण ॲलेप्पी (अलप्प्झुहा) मधील एसटी जोसेफ गर्लच्या विद्यालयात पूर्ण केले. त्यांना गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय खूप आवडायचे.कनिष्ठ महाविद्यालयात असताना त्यांनी गणित विषयात शंभर टक्के गुण मिळवले.त्याच वर्षी त्यांनी शास्त्रामध्ये ही पंच्याण्णव टक्के गुण मिळवले. त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून दरमहा १०० रुपये असे कर्ज घेतले.सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय,थ्रिसूर येथून अभियांत्रिकीचा अभ्यास पूर्ण केला. त्या अभ्यासात हुशार असल्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली, त्यातून त्यांनी ट्युशन फी भरली.त्यांच्या प्रवेशाच्या वेळी गुणवत्ता यादीतील पहिल्या दहा विद्यार्थ्यांत त्यांचा नंबर लागला.कर्जाची परतफेड करण्यासाठी हॉस्टेलमध्ये राहून त्यांनी आपले B.Techचे शिक्षण पूर्ण केले. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी बाकीच्या उपक्रमात सुद्धा सहभाग घेतला.त्यांना विशेषतः बॅडमिंटन खेळण्याची आवड होती.[]

कारकीर्द

[संपादन]

१९८८ मध्ये त्या डीआरडीओमध्ये सामील झाल्या.त्यांना डीआरडीओमध्ये डिझाईन विभागामध्ये आणि तसेच नवीन पिढीच्या बैलिस्टिक क्षेपणास्त्राची रचना,अग्नी. या विभागासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांची नेमणूक केली आहे. टेसी ३,००० किमी लांबीच्या अग्नी-३ क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या सहकारी प्रकल्प संचालक होत्या. त्या अग्नि IV मोहिमेसाठी प्रकल्प संचालक होत्या. अग्नी-४ची २०११ मध्ये यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली होती.टेसी यांची २००९ मध्ये ५००० किलोमीटरच्या अग्नी- ५ प्रकल्पासाठी प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.१९ एप्रिल २०१२ रोजी या क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली.

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]

क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल थॉमस यांना लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.[][]

२०१८ मध्ये तिला फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज - इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, जयपूर (FMS-IRM) येथे डॉ. थॉमस कॅंगन लीडरशिप अवॉर्ड देखील मिळाला.[]

मुंबई येथे झालेल्या ETPrime Women Leadership Awards 2023 मध्ये थॉमस यांना 'वुमन पायोनियर ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला.[][][१०] त्याच वर्षी, त्यांना आशियाई शास्त्रज्ञांनी आशियाई शास्त्रज्ञ 100 पुरस्काराने सन्मानित केले. [११]

थॉमस यांना सोफिया सोसायटी ऑफ द मलंकरा (इंडियन) ऑर्थोडॉक्स चर्चद्वारे २०२५ सालचा डॉ. पॉलोस मार ग्रेगोरियोस अ‍ॅवॉर्ड नामक पुरस्कार प्रदान करण्यात आला.[१२]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "टेसी थॉमस - पहिली भारतीय महिला जिने मिसाईल प्रकल्पावर काम केले". Be An Inspirer (इंग्रजी भाषेत). 2016-12-22. 2018-09-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-07-13 रोजी पाहिले.
  2. "'We watched breathlessly, praying for inner strength as the missile took off'". The Telegraph. 2018-07-13 रोजी पाहिले.
  3. "Dr. Tessy Thomas" (इंग्रजी भाषेत). 2017-07-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-07-13 रोजी पाहिले.
  4. "Malayaly Social Networking Site, Malayalee orkut - People of Kerala, India - GlobalMalayaly.com - www.globalmalayaly.com". 2012-04-22. 2012-04-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-07-13 रोजी पाहिले.
  5. "Scientist honoured for work on Agni missile tech". 2 October 2012 रोजी पाहिले.
  6. "'Missile woman' Tessy Thomas conferred Shastri award". October 2, 2012. 2 October 2012 रोजी पाहिले.
  7. "6th Thought Leadership Lecture Series at FMS-IRM". The Faculty of Management Studies, Institute of Rural Management. 2020-02-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 February 2020 रोजी पाहिले.
  8. Banerjee, Sanhati (16 August 2023). "ETPWLA 2023: Dr. Tessy Thomas wins Woman Pioneer Award at ETPrime Women Leadership Awards 2023". The Economic Times.
  9. "Watch ETPWLA 2023: Celebrating excellence in women leadership". The Economic Times.
  10. Banerjee, Sanhati; Pema, Tenzin (31 July 2023). "TPWLA 2023: Grand Felicitation Ceremony of ETPrime Women Leadership Awards to be held on August 4". The Economic Times.
  11. "The Asian Scientist 100". Asian Scientist. 13 March 2025 रोजी पाहिले.
  12. "आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान". दैनिक लोकमत. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.