टॅली सोल्यूशन्स
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ब्रीदवाक्य | पॉवर ऑफ सिंप्लिसिटी |
---|---|
प्रकार | खाजगी कंपनी |
उद्योग क्षेत्र | माहिती तंत्रज्ञान सेवा |
संस्थापक | श्याम सुंदर गोएंका |
मुख्यालय | बंगळूर, भारत |
सेवांतर्गत प्रदेश |
भारत बांग्लादेश मध्य पूर्व इंग्लंड |
महत्त्वाच्या व्यक्ती |
शीला गोएंका (अध्यक्ष) भरत गोएंका (व्यवस्थापकीय संचालक) |
उत्पादने |
Tally.ERP 9 Tally.Developer 9 Shoper 9 Tally.Server 9 |
संकेतस्थळ | http://www.tallysolutions.com |
टॅली सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही बंगलोरमधील एक संगणक कंपनी आहे. ही शंभराहून अधिक देशांमध्ये आपली सॉफ्टवेर उत्पादने विकते.
तंत्रज्ञान
[संपादन]टॅली सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ‘टॅली’ हे एका कोअर प्रोप्रायटरी इंजिनसह विकसित करण्यात आलेले फायनॅन्शियल अकौंटिंग सॉफ्टवेर आहे. त्याची पहिली आवृत्ती १९८८ साली आली. सुरुवातीला रोजच्या व्यवहारातील आकडेमोड, हिशेब, जमा-खर्चाची नोंद एवढ्यापुरत्या मर्यादित कामासाठी हे सॉफ्टवेर बाजारात आले.मात्र त्याच्या अनेक सुधारित आवृत्त्या निघाल्यानंतर ते आता वित्तीय संस्थांच्या, ट्रस्टींच्या, अन्य सोसायटींच्या आणि बँकांच्या ताळेबंद अहवालांसाठी वापरले जाते. टॅली वापरून आर्थिक वर्षाची हिशेब जुळवणी, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट अगदी सहजरीत्या बनवता येतात. या सॉफवेअरमुळे काही क्षणात एंट्रीज फीड करून कामाचा वेळ वाचतो आणि एफिशियन्सीहि वाढते, असे जाणकारांचे आणि ग्राहकांचे मत आहे, त्यामुळे हिशेबनीस, सनदी लेखापाल म्हणजे सीए आणि अकाउंटंट ह्यांची मोठी सोय झाली आहे.
टॅलीचे ८० टक्क्यांहून अधिक वापरकर्ते भारतातच आहेत..
उत्पादने
[संपादन]टॅली सोल्यूशन्स कंपनीची खालील चार उत्पादने आहेत. :
- Tally.ERP 9
- Tally.Developer 9
- Shopper 9
- Tally.Server 9
चॅनेल नेटवर्क
[संपादन]टॅलीच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी त्यांचे एक भागीदार नेटवर्क आहे.
अध्य्क्ष
[संपादन]एस.एस. गोएंका हे टॅली सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष होते. सध्याचे अध्यक्ष भरत गोएंका आहेत.