टी.के. राममूर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तिरूचिरापल्ली कृष्णास्वामी राममूर्ती, ऊर्फ टी.के. राममूर्ती (तमिळ: டி. கே. ராமமூர்த்தி ; रोमन लिपी: T. K. Ramamoorthy), (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा तमिळ-भारतीय संगीतकार व वायोलिनवादक आहे. एम.एस. विश्वनाथन व राममूर्ती ही संगीतकार जोडी इ.स. १९५० व इ.स. १९६०च्या दशकांत दक्षिण भारतातील चित्रपटसृष्टींत प्रचंड लोकप्रिय ठरली. विश्वनाथन-राममूर्ती जोडीने ७००हून अधिक चित्रपटांना संगीत दिले. इ.स. १९६५ साली ही जोडी फुटली. तेव्हापासून राममूर्तीने स्वतंत्रपणे संगीतदिग्दर्शन केले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.