टी.के. राममूर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तिरूचिरापल्ली कृष्णास्वामी राममूर्ती, ऊर्फ टी.के. राममूर्ती (तमिळ: டி. கே. ராமமூர்த்தி ; रोमन लिपी: T. K. Ramamoorthy), (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हा तमिळ-भारतीय संगीतकार व वायोलिनवादक आहे. एम.एस. विश्वनाथन व राममूर्ती ही संगीतकार जोडी इ.स. १९५० व इ.स. १९६० च्या दशकांत दक्षिण भारतातील चित्रपटसृष्टींत प्रचंड लोकप्रिय ठरली. विश्वनाथन-राममूर्ती जोडीने ७००हून अधिक चित्रपटांना संगीत दिले. इ.स. १९६५ साली ही जोडी फुटली. तेव्हापासून राममूर्तीने स्वतंत्रपणे संगीतदिग्दर्शन केले.