टियानमेन माउंटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टियानमेन पर्वत
center}}
टियानमेन पर्वत
टियानमेन पर्वत is located in चीन
टियानमेन पर्वत
टियानमेन पर्वत
हुनान मधील जागा
उंची
फूट (१५१८.६ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
{{{क्रमांक}}}
ठिकाण
Flag of the People's Republic of China चीन
पर्वतरांग
हुनान
गुणक
(शोधा गुणक)
पहिली चढाई
सोपा मार्ग


टियानमेन माउंटन (अर्थ:'स्वर्गाचा दरवाजा असणारा पर्वत') हा चीनमधील हुनान प्रांताच्या वायव्य भागात, झांगजियाजी येथील टियानमेन माउंटन नॅशनल पार्कमध्ये स्थित एक पर्वत आहे.

पर्वत[संपादन]

इ.स. २००५ मध्ये फ्रेंच पोमा या[१] कंपनीने जवळच्या झांगजियाजी रेल्वे स्टेशनपासून पर्वताच्या शिखरापर्यंत केबलकार बांधली होती. यात ९८ डब्बे आणि एकूण ७,४५५ मी (२४,४५९ फूट) लांबीचा टियानमेन माउंटन केबल वे होती. ही "जगातील उंच पर्वतांचा सर्वात लांब प्रवासी केबलवे" म्हणून पर्यटन प्रकाशनांमध्ये दावा केला जातो. या केबल कारने १,२७९ मी (४,१९६ फूट) ची चढाई केली जाते. सर्वोच्च ग्रेडियंट ३७ अंश आहे. काचेच्या मजल्यांच्या भागांसह, पर्वताच्या शिखरावर उंच कडाच्या बाजूने बांधलेल्या किलोमीटरच्या मार्गांवर पर्यटक चालू शकतात. एक ११ किमी (७ मैल) लांबीचा रस्ता - टोंगटियन अव्हेन्यू - ९९ वळणांसह पर्वताच्या शिखरावर देखील पोहोचतो आणि पर्यटकांना १३१.५ मी (४३१.४ फूट) उंचीच्या डोंगरावरील तिआनमेन गुहेत नेतो.

तियानमेनशान मंदिर शिखरावर आहे. तेथे जाण्यासाठी चेअरलिफ्ट किंवा फूटपाथ प्रवेश आहे. तेथील मूळ मंदिर तांग राजवंशाच्या काळात बांधले गेले. २०व्या शतकाच्या पहिल्या भागात ते नष्ट झाले. इ.स. १९४९ मध्ये, चिनी कम्युनिस्ट क्रांती संपुष्टात आल्यावर, तांग राजवंशीय वास्तुकलेसह नवीन मंदिराचे बांधकाम सुरू झाले. सध्याचे मंदिर २ हेक्टर (४.९ एकर) भागात वसलेले आहे.

इ.स. २००७ मध्ये, अलेन रॉबर्टने कमानीच्या खालच्या कड्याला, उघड्या हाताने आणि संरक्षणाशिवाय स्केल केले. त्याच्या स्मरणार्थ तेथे एक फलक लावला आहे.

वर्ल्ड विंगसूट लीगने तियानमेनमध्ये पहिली आणि दुसरी वर्ल्ड विंगसूट चॅम्पियनशिप आयोजित केली होती. ८ ऑक्टोबर २०१३ रोजी दुसऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी प्रशिक्षणाच्या उडीदरम्यान, व्हिक्टर कोव्हॅट्स पॅराशूट उघडू शकला नाही तेव्हा त्याचा मृत्यू झाला.[२][३]

ऑगस्ट २०१६ मध्ये, "कॉइलिंग ड्रॅगन क्लिफ" नावाचा टोंगटियन अव्हेन्यू दिसणारा काचेचा स्कायवॉक,[४] लोकांसाठी खुला करण्यात आला.[५]

सप्टेंबर २०१६ मध्ये, एका इटालियन ड्रायव्हरने त्याच्या फेरारी ४५८ इटालियातून सुमारे ११ किलोमीटर (६.८ मैल) लांबीचा मार्ग १० मिनिटे आणि ३१ सेकंदात पार करून नवीन विक्रम स्थापित केला.[६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "The Sky Gate Escalators". Lift Magazine. Archived from the original on 2018-08-04. 7 June 2018 रोजी पाहिले.
  2. ^ Armstrong, Paul (October 12, 2013). "Wingsuit flier Viktor Kováts dies after cliff crash horror". Hong Kong. CNN. December 1, 2013 रोजी पाहिले.
  3. ^ Cadenbach, Christoph (November 25, 2013). "Sprung ins Ungewisse" (German भाषेत). Süddeutsche Zeitung Magazin. December 1, 2013 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "Glass cliff walk in China: Scary Coiling Dragon Cliff walk opens". News.com.au. August 3, 2016. September 10, 2016 रोजी पाहिले.
  5. ^ Yu, Elaine (August 2, 2016). "China's cliff-clinging glass skywalk opens to public". CNN. August 2, 2016 रोजी पाहिले.
  6. ^ BBC, NEWS (2016-09-23). "Italian races up China daredevil road". BBC News (इंग्रजी भाषेत). 2020-09-22 रोजी पाहिले.