नैसर्गिक पूल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नैसर्गिक पुल.jpg

नैसर्गिक पूल किंवा नैसर्गिक कमान जमीन किंवा खडकाखालील भराव वाहून जाउन किंवा नैसर्गिक कारणाने घासला जाऊन तयार झालेली नैसर्गिक खडकरचना आहे. नैसर्गिकरीत्या ज्या ठिकाणी कठीण व खाली मृदू खडक असतात, व मृदू खडक काही अपक्षयी कारणांच्या संपर्कात येतात व त्यांचे घटण होते व कटीण खडक तसेच रहातात, त्याठिकाणी हे पूल किंवा कमानी तयार होतात.

त्या मुख्यतः किनारपट्टी भागात पहावयास मिळतात.


हा भारताच्या महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय महामार्ग २२२ रस्त्यालगत अणे घाटात एक नैसर्गिक पूल आहे. हा पूल मळगंगा देवीच्या मंदिराजवळ ओढ्याच्या प्रवाहाशेजारी आहे. भौगोलिक स्थान-

  • अक्षांश- उ +19° 9' 4.84",
  • रेखांश- पू +74° 13' 0.78"

अछिद्र खडकाखालील चुनखडीचे खडक विरघळुन गेल्यामुळे प्रवाह त्याखडकाखालुन तयार झाल्यामुळे पुलाची रचना निर्माण झाली आहे.