टिबुकली
आकार
[संपादन]टिबुकली(डॅबचिक) हा पाठीचा भाग भुऱ्या रंगाचा, पोटाकडे रेशमी पांढऱ्या रंगाचा, शेपटी नसलेला, गुबगुबीत असा साधारण कबुतराएवढा (२३ ते २९ सें. मी.) पाणपक्षी आहे. या पक्षाचे नर-मादी एरवी दिसायला सारखेच असतात. मात्र विणेच्या काळात नराच्या डोक्याचा आणि मानेचा रंग गडद तपकिरी होतो. टिबुकली पाण्यात बुडी मारते आणि काही अंतरावर गेल्यावर पाण्यातून पुन्हा बाहेर येते.[१]
वास्तव्य
[संपादन]टिबुकली संपूर्ण भारतासह, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान येथे जोडीने किंवा लहान थव्यात लहान-मोठ्या तलावांत, झिलाणीत राहते.
आढळस्थान
[संपादन]टिबुकली समुद्रसपाटीपासून सुमारे २५०० मीटर उंचीपर्यंत सर्वत्र आढळते.
प्रजाती
[संपादन]रंगावरून आणि आकारावरून टिबुकलीच्या किमान नऊ उपजाती आहेत. भारतात आढळणारी एकमेव उपजात Tachybaptus ruficollis capensis ही आहे.
खाद्य
[संपादन]टिबुकली हा पाणकीटक, बेडूक, अळ्या व इतर छोटे जलचर खाणारा पक्षी आहे. याचे घरटेही पाण्यात तरंगणारे व छोटे असते. ते काटक्यांचे बनलेले असते.
प्रजनन काळ
[संपादन]विणीचा हंगाम एप्रिल ते ऑक्टोबर असून टिबुकली मादी एकावेळी ३ ते ५ शुभ्र पांढऱ्या रंगाची अंडी देते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंत सर्व कामे नर-मादी मिळून करतात.
पहा पक्ष्यांची मराठी नावे Archived 2015-09-16 at the Wayback Machine.
चित्रदालन
[संपादन]-
LittleGrebe (छोटी टिबुकली)
-
नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यातील टीबूकली
संदर्भ
[संपादन]- ^ कसंबे, राजू. "महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी (२०१५)". २२ एप्रिल २०२० रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
[[वर्ग:पक्षी]