टिनटिनच्या साहसकथा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


टिनटिनच्या साहसकथा
लेखक एर्जे
भाषा मूळ भाषा फ्रेंच
देश बेल्जियम
साहित्य प्रकार साहसकथा
प्रकाशन संस्था कास्टरमन

टिनटिनच्या साहसकथा (फ्रेंच:Les Aventures de Tintin) ही एक फ्रेंच चित्रकथामाला आहे. बेल्जियन कलाकार एर्जे किंवा जॉर्जस रेमी यांची ही कलाकृती आहे. ही माला ५० भाषांत अनुवादित झालेली आहे. भारतासह जगभर ही मालिका प्रसिद्ध आहे.

कथासूत्र[संपादन]

पात्रे[संपादन]

पात्रांची नावे इंग्रजी आवृत्तीप्रमाणे आहेत.

टिनटिन व स्नोई[संपादन]

मुख्य पान: तँतँ

कथेचा नायक. बेल्जियन पत्रकार.
स्नोई -फ्रेंच आवृत्तीत नाव मिलु(Milou). टिनटिनचा पाळीव कुत्रा. व्हाईट फॉक्स टेरियर जातीचा कुत्रा.

कॅप्टन हॅडॉक[संपादन]

कॅप्टन आर्चिबाल्ड हॅडॉक, बोटीचा कप्तान. टिनटिनचा जिवलग मित्र. कथेप्रमाणे हा बेल्जियन, स्कॉटिश किंवा फ्रेंच असू शकतो. क्रॅब विथ दी गोल्डन क्लॉज या पुस्तकात प्रथमदर्शन.
याचे नाव (आर्चिबाल्ड) शेवटच्या गोष्टीत उघडकीस आणले आहे.

प्रोफेसर कॅलक्युलस[संपादन]

नेहमी आपल्याच तंद्रीत असलेला व थोडासा बहिरा असा एक भौतिकशास्त्रज्ञ. रेड रॅखम्स ट्रेजर मध्ये प्रथमदर्शन.

काल्पनिक देश व स्थळे[संपादन]

टिनटिनमध्ये अनेक काल्पनिक स्थळे व देश दाखवण्यात आले आहेत.

काल्पनिक देश[संपादन]

सिल्डाव्हिया[संपादन]

युरोपातील देश. बोर्डुरियाचा शेजारी देश.

बोर्डुरिया[संपादन]

युरोपातील देश. सिल्डाव्हियाचा शेजारी देश.

सॅन थिओडोरो[संपादन]

दक्षिण अमेरिकेतील देश.