टाकळीभान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

टाकळीभान हे नेवासा आणि श्रीरामपूर यांच्यामध्ये वसलेले एक गाव आहे. 

श्रीरामपूर तालुक्यातील राज्य क्र.४४ नेवासा श्रीरामपूर रोडवर श्रीरामपूरपासुन १५ किलोमीटर व नेवाशापासुन १८ किलोमीटरवर असलेले प्रती पंढरपूर म्हणून नावलौकिक असलेले टाकळीभान विठ्ठल मंदीर त्यातील मुर्ती यादवकालीन नाते सांगणारे विठ्ठल देवस्थान येथे सालाबादप्रमाणे आषाढी एकादशीला मोठा उत्सव साजरा करण्यात येतो.

महाराष्टातील कोट्यावधी वारकर्याचे श्रध्दास्थान असलेले विठोबा माऊली सर्वञ दोन हाताच्या रुपात दर्शन देतो परंतु या विठ्ठल मंदीराचे वैशिष्ट म्हणजे येथील मुर्ती विठ्ठलाची ओळख असणारे दोन हात कमरेवर आहेतच परंतु आनखी दोन हात आसुन एका हातात चक्र तर दुसऱ्या हातात शंख असुन विठ्ठलाच्या गळ्यात वैजयंती माळ व जानवेही कोरलेले आहे. कमरेवर मेखला असुन दोन टांगी धोतर नेसलेले आहे मुखुटावर शाळुंकेसह शिवलींग व विशेष महत्त्वाचे म्हणजे या विठोबाला मिशा असलेली ही आगळीवेगळी मुर्ती असुन येथे एक शिलालेखही पहावयास मिळतो तसेच पंढरपूरात जसी रुखमिनी रुसुन लांब आहे तशी इथे ती एकाच शिळेवरती विठ्ठलाच्याच शेजारीच उभी आहे. असे हे आगळेवेगळे चतुर्भुज स्वरुप येथे प्रामुख्याने बघावयास मिळते.

यादवकाळामध्ये भानू नावाच्या राज्याची राजधानी टाकळीभान हि होती मुळातच सर्व धर्मीयांचा दैवत मानला जानारा विठ्ठल यादवकालीन राज्याचे कुलदैवत या भानू राज्याला विठ्ठलाने विष्णू रुपात दर्शन दिले होते.पण मंदिर त्याही अगोदरचे असल्याचे पुजारी सांगतात. इ.सन. ४००मध्ये भानू कुळाने पांडुरंग पल्लीत मुख्य स्थानावर पुषण (सुर्य) व विष्णू (विठ्ठल) या देवतेची एकञीत चतुर्भुज मुर्ती स्थापण केली होती. या मंदीराच्या देखभाली साठी ८८ एकर जमीन आहे. पण या दैवताचा उगम अद्यापही सापडलेला नसून पंढरपूर निवासाआधी कसा उत्क्रांत झाला याचा शोध अद्यपही अनुत्तरीत आहे. त्यामुळे विठ्ठलाचा अभ्यास करणारे देशी विदेशी संशोधक या मुर्तीचा आभ्यास करत आहेत.

पंढरपूर्व काळात महाराष्ट्र व कर्नाटक विठ्ठलोपासना सुरु होती परंतु अशा प्रकारचे चतुर्भुज रुप कुठेही पाहवयास मिळत नाही. मध्यप्रदेशामध्ये अशा प्रकारची मुर्ती इ.सन ४१०/१६ च्या आसपासची मुर्ती सापडते पण ही मुर्ती विठ्ठलाशी कसे नाते सांगते हेआद्यापहि उलगडलेले नाही. पण विठ्ठलाच्या उतक्रांतीत पंढरपुरचे महत्त्व वाढत गेले. आणी ह्या चतुर्भुज मुर्तीचे ध्यान लोप पावले असे संशोधकांचे मत आहे.

या देवस्थान मध्ये आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाई यांची विधीवत पुजा, अभिषेक होऊन विविध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.या निमित्ताने पंचक्रोशीतील वारकरी व भावीक पायी चालत येउन दर्शन घेतात. दिवसभर या ठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ असते . व आषाढ पोर्णिमेला गोपालकाला होउन सांगता होते.

संतांनी वर्णन केलेल्या या रुपाची मुर्ती असेल की त्यांच्या भावविश्वातील विठ्ठलाचे वर्णन हे नेमके सांगता येत नाही. पण तरिही येथील चतुर्भुज विठोबा माऊली काहितरी वेगळं सांगत टाकळीभान मध्ये उभा आहे.एवढे माञ निश्चीत.......

परीसराचेग्रामदैवत आसलेल्या शंभु महादेवाचे पुरातन सुमारे  पाचशे वर्षापुर्वीचे हेंबाडपंथी मंदीर आहे.मंदीराचे संपुर्ण बांधकाम मोठमोठ्या दगडी शिळांमध्ये करण्यात आलेले आहे.बांधकामासाठी अत्यंत बेमालुम पणे चुण्याचा वापर केला इसल्याने शिळावर शिळा मांडुन भव्य मंदीर बांधल्याचा भास होतो.तात्कालीन वास्तु विशारदाचे त्यामुळे कौतुक केले जाते.त्या काळातही निर्माण केलेला वास्तु कलेचा हे मंदीर म्हणजे एक उत्तम नमुना आहे.

सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात याञौत्सव साजरा केला जातो.दोन दीवस चालणाऱ्या या याञौत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.सोमवारी सकाळी ६ ते ७ या वेळेत भव्य गंगाजल मिरवणुक.या मिरवणुकित शेकडो तरुण सहभागी होवुन गंगाजल घेवुन येतात.वाजत गाजत व फटाक्यांच्या आताषबाजीत मिरवणुक काढली जाते.सकाळी ७ ते १२ प्रवरासंगम येथील पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली लघुरुद्रा भिषेक, १२ वाजता दुग्धाभिषेक, सायंकाळी ७ वाजता शोभेच्या दारुची मनमोहक अताषबाजी, राञी ८ ते ९ ग्रंथाची छबीना मिरवणुक तर राञी ९ ते १२ मोफत लोकनाट्याचा कार्यक्रम. मंगळवारी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम.दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत जिल्हाभरातुनव जिल्ह्याच्या बाहेरुन आलेला नामवंत मल्लांचा भव्य कुस्त्यांचा हगामा.राञी ८ ते ११ वाजेपर्यंत म्युझिक मेकर्स यांचा दीमाखदार संगित रजनीचा कार्यक्रम .या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आसल्याने याञौत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत

*मोहन जगताप टाकळीभान* 8379803211