टाकणकार (समाज)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

टाकणकार पारधी ही आदिवासी समाजातील एक जमात आहे.ती भारताच्या महाराष्ट्रातील अमरावती, अकोलाबुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यांत आढळते. हा समाज अंदाजे चारशे-पाचशे वर्षापासून राजस्थान-गुजरात मधून महाराष्ट्रात स्थलांतरित झाला असावा. समाजातील लोकगीते (खूळ), लोककथा (परसंग) यातून तसे उल्लेख येतात.[ संदर्भ हवा ] समाजाचे कुलदैवत मातृदेवता आहे. तिला ते 'वळेखन' या नावाने संबोधतात. या शिवाय तिला खुऱ्याळ, मेळली, चोयटी इत्यादी नावेसुद्धा आहेत. या समाजाची बोलीभाषा 'वाघरी' आहे, ती राजस्थानी व गुजराती बोलीशी जवळीक साधते.


      "मंगलसिंग जागऱ्या" 

टाकणकार समाजाचा आद्य जागऱ्या म्हणून मंगलसिंग जागऱ्या यांचे नाव आजही समाजात प्रचलीत आहे. मंगलसिंग जागऱ्या हा मालवे/ डाबेराव कुळाचा पूर्वज असल्याचा पुरावा टाकणकार समाजातील कथा/परसंग या मध्ये आहे. तसेच टाकणकार समाजात 'तरांगडे' याला खूप महत्व आहे. देवीचे सोन्या चांदीचे पातर असते त्यावर वळेखण मातेचे कोरलेली प्रतिमा आहे त्या पत्राच्या खालील भागात घुंगस घेऊन आद्य जागरे मंगलसिंग जागऱ्या (मालवे ) यांचे सुद्धा प्रतिमा कोरलेली असते.

     आदिवासी टाकणकार समाजाच्या संस्कृतीचा जनक म्हणून आद्य जागरे मंगलसिंग यांना समाज मानतो. 

सदर माहिती ही टाकणकार समाजाची आहे. ही माहिती आजपर्यंत आमच्या पूर्वजांकडून मुखोगत इथवर आली तेच या ठिकाणी मांडली आहे. सतिशसिंह मालवे मुऱ्हा देवी

वळेखण नवस दान[संपादन]

टाकणकार समाजातील देवीची स्तुतिपर भजने म्ह्टली जातात त्याला ते 'खूळ'असे म्हणतात.ज्या गावात टाकणकार समाज आहे त्या गावात आपल्या तांड्यात निबांच्या झाडाखाली देवीचा थळा वटा / ओटा किंवा मंदिर असते.

ओट्यावरील मेळली देवीचे तोंड केव्हाही पूर्वेकडे असते व देवीच्या ओट्यामागे मंदिर असल्यास जवळपास कडूनिंबाचे झाड असते. देवीचा खुणा (कुळाचाराचे देव) घराच्या नैर्ऋत्य कोपऱ्यात ठेवतात. त्यास वळखुणा म्हणतात.

तसेच ज्याच्या अंगात देवी येते, तो देवीचा भुया असतो. त्याच्या घरी वळखुणा असतो, तोच वळागोत्री असतो. किंवा काही लोक एक वेगळे घर वळखुणा म्हणून तयार करतात.

कुळे, आडनावे व खळगोत्री[संपादन]

टाकणकार समाजात मुख्यतः सात कुळे आहेत, त्यामधे खांदे (सिसोदिया,खानंदे,सिसोदे), हदे (चव्हाण), राठोड, सोळंके (खातेले/खुराळे), भरगडे (झाकर्डे), शेले (पवार) व खोनगरे (सोनोने) ही होत. समाजातील कुळे आडनावे व खोळगोत्री :- १) मालोये व कुवारे ही कुळे आहेत, दोघाचे आडनाव डाबेराव. (२) खातले व खुराळे ही कुळे आहेत, दोघाचे आडनाव सोळंके . (३) शेले हे कुळ आहे त्यातिल लोकांचे आडनाव पवार आहे (४) हदे हे कुळ आहे, आडनाव चव्हाण; यापैकी कोणी हळदे लिहितात. पण ते खरे चव्हाण आहेत. (५)भरगडे ६) खोनगरे सोनोने एकच आहेत. कोणी कुळ लिहितात तर कोणी आडनाव, तर कोणी राणे लिहितात. " राणे ही उपाधी असून काहीजण ती आडनावासाठी लावतात."

टाकणकार समाजातील कुळाप्रमाणे देस्तान..

क्र. कुळ आडनावे देस्तान १ देस्तान २ देस्तान ३
खांदे खानंदे,सिसोदे, सिसोदिया वळेखण मेळली चोहट्टी
खुराडे/खातेले सोळंके वळेखण/दगाव देवी खुऱ्‍याळ मावली ( खुर्याळ फक्त खुराडे कुळामध्ये आहे.)
मावले/मालोये डाबेराव,मालवे,कुवारे वळेखण मरेठी मावली

(त्याचप्रमाने या कुळाला "मोवाल" देस्तान पण लागू आहे.)

राठोड राठोड वळेखण मेमाय मावली तसेच दादाजी लागू
हदे चव्हाण, हळदे वळेखण गुजराथन मावली, तसेच मोवाल लागू
शेले पवार,झाकर्डे वळेखण मर्ह्याटी मावली तसेच या कुळात कुणाला देवाज्ञा झाल्यास "दादाजी" लागू
खोनगरे सोनोने वळेखण कोखळनी मावली दादाजी असतो

हेसुद्धा पहा : -

 1. ^ Chavan, Dev Chavan , Dev. "* आई वळेखण देवी *". आदिवासी टाकणकार पारधी समाज (वाघरी). 2019-08-23 रोजी पाहिले.