टाकणकार
टाकणकार ही आदिवासी समाजातील एक जमात आहे.ती भारताच्या महाराष्ट्रातील अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यात आढळते. हा समाज अंदाजे चारशे-पाचशे वर्षापुर्वी राजस्थान-गुजरात मधून महाराष्ट्रात स्थलांतरित झाला असावा.समाजातील लोकगीते(खूळ), लोककथा (परसंग) यातून तसे उल्लेख येतात.[ संदर्भ हवा ] समाजाचे कुलदैवत मातृदेवता आहे. तिला ते 'वळेखन' या नावाने संबोधतात. या शिवाय खुऱ्याळ, मेळली, चोयटी इत्यादी नावेसुद्धा तिला आहेत. या समाजाची बोलीभाषा 'वाघरी' आहे, ती राजस्थानी व गुजराती बोलीशी जवळीक साधते.
संस्कृती
[संपादन]या समाजातील देवीची स्तुतिपर भजने म्ह्टली जातात त्याला ते 'खुळ'असे म्हणतात.ज्या गावात टाकणकार समाज आहे त्या गावात आपल्या तांड्यात निबांच्या झाडाखाली देवीचा थळा वटा / ओटा किंवा मंदिर असते.
मावली देवीचे ओठयावरील तोंड केव्हाही पूर्वेकडे असते व देवीच्या ओठयाच्या पाठीमागे मंदिर असल्यास जवळपास कड्निंबाचे झाड असते. देवीचा खुना ( कुळाचाराचे देव ) घराच्या नैऋत्य कोपरा निवडुन तेथे ठेवतात त्यास वळखुणा म्हणतात.
तसेच ज्याच्या अंगात देवी येते तो देवीचा भुवा असतो त्याच्या घरी वळखुना असतो,तोच वळागोत्री असतो किंवा काही लोक एक वेगळे घर वळखुना म्हणुन तयार करतात.
टाकणकार ही जमात महाराष्ट्रातील अकोला, बुलढाणा, अमरावती मध्ये मुख्य प्रमाणात आढळते. या समाजातील लोक हे निसर्ग व मातृपुजक आहेत या समाजाची निर्मिती सात कुळापासुन झालेली आहे म्हणुनच या संस्कृती ला खातमोघ्या संस्कृती म्हणून ओळखल्या जाते या समाजात मुख्यतः सात कुळे आहेत 1. खानंदे हे कुळ आहे व ते सिसोदिया,खांदे हे आडनाव वापरतात. 2.हदे हे कुळ आहे व ते हळदे, चव्हाण हे आडनाव वापरतात. 3. राठोळ हे कुळ आहे व ते राठोड हे आडनाव वापरतात. 4.खातले/खुर्याळे हे कुळ आहे ते सोळंके हे आडनाव वापरतात. 5.शेले हे कुळ आहे ते पवार,झाकर्डे व भरगडे हे आडनाव वापरतात.
6.खोनगरे हे कुळ आहे ते सोनोने,खोनगरे हे आडनाव वापरतात.
7.कुवारे/मावले हे कुळ आहे ते डाबेराव हे आडनाव वापरतात.
टाकणकार समाजातील कुळाप्रमाणे देस्तान..
क्र. | कूळ | आडनावे | देस्तान १ | देस्तान २ | देस्तान ३ | |
---|---|---|---|---|---|---|
१ | खांदे | खानंदे,सिसोदे, सुसतकर, सिसोदिया | वळेखण | मेळ्ळी | चोहट्टी मावली | |
२ | खुराळे/खातले | सोळंके | वळेखण/दगाव देवी | खुऱ्याळ | मावली | |
३ | कुवारे/मावले | डाबेराव, मालवे, माळवे,कुवारे | वळेखण | मरठ्ठी | सिंदवी मावली | |
४ | राठोड | राठोड | वळेखण | मेमाय | मावली | |
५ | हदे | चव्हाण, हळदे | वळेखण | गुजरातन | मावली | |
६ | शेले/भरगडे | पवार,झाकर्डे, | वळेखण | मर्ह्याटी | मावली | |
७ | खोनगरे | सोनोने | वळेखण | कोखळनी | मावली |
हे सुद्धा पहा |