विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ञ हे देवनागरी लिपीमधील दहावे व्यंजन आहे. हे नासिक्य व्यंजन च-छ-ज-झ साठी अनुनासिक (पर-सवर्ण) आहे. वर्णमालेच्या क्रमात च,छ,ज,झ नंतर ञ येतो.

उच्चारण[संपादन]

शब्द उदाहरणे[संपादन]

पर-सवर्ण जोडलेल्या व्यंजनाच्या उच्चाराचा शब्द हा शब्द मराठीत शुद्धलेखनाच्या नियमांसअनुसरून पर-सवर्णाच्या ऐवजी या रकान्यात दिल्याप्रमाणे अनुस्वार देऊन लिहितात.
अञ्जन', काञ्चन, लाञ्च्छन,पाञ्चजन्य, नञ् (तत्पुरुष समास) अंजन, कांचन, लांच्छन, पांचजन्य


दक्षिण भारतातील वापर[संपादन]

या अनुनासिकाचा मल्याळम भाषेत बऱ्यापैकी वापर आहे. काञ्ञङ्ङाट् या स्वरूपाची उचारणे मल्याळममध्ये असू शकतात.

संस्कृत भाषेतील उदाहरणे[संपादन]

कालिदासाच्या मेघदूतात याचना अशा अर्थाने याच्ञा हा शब्द वापरला आहे. त्या शब्दात ञ लाच जोडलेला नसून, चला ञ जोडला आहे.[१]

पूर्ण ओळ अशी आहे :-

याच्ञा मोघा वरम् अधि‌‌गुणे नाधमे लब्धकामा । .... मेघदूत १.६


वस्तुतः ज्ञ हे अक्षर 'ज' आणि 'ञ' मिळून झाले आहे. ज+ञ=ज्ञ. हिंदीत या अक्षराचा उच्चार ग्य तर मराठीत द्न्य करतात, त्यमुळे या अक्षरात दडून बसलेला 'ञ' ओळखू येत नाही. बंगाली आणि इतरही काही भारतीय ज्ञानेश्वरचे इंग्रजी स्पेलिंग Jnaneshwar असे करतात. हिंदीभाषक Gnyaneshwar, तर मराठीभाषक Dnyaneshwar असे करताना दिसतात.पण खरंतर 'ज्ञ'चं खरं उच्चारण सगळ्या भाषांमध्ये ज्+ञ हेच आहे.

इतर लिपीतील अक्षर लेखन[संपादन]

ब्राह्मी लिपीत ञ हे अक्षर ञ असे लिहिले जाते. बंगालीत हेच अक्षर ঞ असे (मुळातले सिद्धम् लिपीतले) दाखवले जाते. गुजराथीत ઞ असे अक्षराच्यावरील रेषेशिवाय दाखवले जाते.

लिपी उच्चारणाचे अक्षर लेखन
देवनागरी (मराठी,हिंदी,संस्कृत नेपाळी)
ISO 15919 ñ
अक्षरांचे उच्चार दाखविणारी आंतरराष्ट्रीय पद्धती

आय.पी.ए.

ɲ
ब्राह्मी ञ
गुजराथी
बंगाली
ओडिया
गुरुमुखी
तेलुगू
कन्नड
मल्याळम
तमिळ

संदर्भ[संपादन]