ज्युलियाना, नेदरलँड्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्युलियाना (जन्म : द हेग, नेदरलँड्स, ३० एप्रिल १९०९; - बार्न, नेदरलँड्स, २० मार्च २००४) ही नेदरलँड्सची राणी होती. हिचे पूर्ण नाव ज्युलियाना लुई एमा मरी विल्हेमिना होते.

ज्युयाना ही विल्हेमिना आणि राजकुमार हेनरी यांचे एकुलते एक अपत्य होती. तिच्या जन्मापासून ती नेदरलँड्सची भावी शासक असल्याचे ठरले होते. ज्युलियानाला तिचा पती राजकुमार बर्नहार्डपासून चार अपत्ये झाली. पैकी बिॲट्रिक्स ही पुढे नेदरलँड्सची राणी झाली.