ज्युलियन असांज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ज्युलियन असांज
Julian Assange (Norway, March 2010).jpg
जन्म ३ जुलै, १९७१ (1971-07-03) (वय: ४८)
क्वीन्सलॅंड, ऑस्ट्रेलिया
राष्ट्रीयत्व ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
पेशा पत्रकार, संपादक
प्रसिद्ध कामे विकीलीक्सचा संपादक

ज्युलियन असांज (इंग्लिश: Julian Assange; जन्म : क्वीन्सलॅंड, ३ जुलै १९७१) हा एक ऑस्ट्रेलियन पत्रकार, संपादक व चळवळवादी आहे. असांज हा विकिलीक्स ह्या गुप्त कागदपत्रे इंटरनेटवर प्रकाशित करणाऱ्या संकेतस्थळाचा मुख्य संपादक व प्रवक्ता आहे. आजवर असांजच्या नेतृत्वाखाली विकिलीक्सने लाखो गुप्त सरकारी अहवाल, मेमो व संवेदनशील कागदपत्रे खुली केली आहेत. ह्यांमध्ये अमेरिकेच्या इराकअफगाणिस्तान यांमधील युद्धांबाबत अनेक दस्तावेजांचा समावेश आहे. २८ नोव्हेंबर २०१० रोजी विकिलीक्सने अमेरिकेच्या परराष्ट्रीय खात्याने व जगभरातील अमेरिकन राजदूतांनी लिहिलेला अत्यंत गुप्त अहवाल प्रकाशित करण्यास सुरुवात केली. ह्यामुळे असांजने अमेरिकेसोबत जगभरातील अनेक देशांचा रोष ओढवून घेतला आहे.

आयुष्य[संपादन]

असांज यांचा जन्म क्वीन्सलॅंडमध्ये झाला. त्यांच्या सावत्र वडिलांच्या म्हणण्यानुसार ते लहानपणापासूनच हुशार होते, व त्यांना "काय बरोबर आहे व काय चूक आहे" याची जाणीव फार लहान वयात आली होती.

आजवर असांज अनेक देशांमध्ये राहिला आहे. २०१० सालच्या ऑगस्टमध्ये स्वीडनच्या पोलीस खात्याने असांजवर एका महिलेचा बलात्कार केल्याबद्दल खटला भरला व असांजला फरारी घोषित केले व असांजला स्वीडनमध्ये परतण्याचा आदेश दिला. ३० नोव्हेंबर २०१० रोजी इंटरपोल ह्या आंतरराष्ट्रीय पोलिस संस्थेने असांजवर अटक वॉरंट लागू केले व ७ डिसेंबर २०१० रोजी त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली. आपल्यावर बलात्काराचा खोटा आरोप लावला गेला आहे, अशी असांजची भूमिका आहे.

विकिलीक्स[संपादन]

असांज यांनी ४ ऑक्टोबर २००६ रोजी विकिलीक्सची स्थापना केली. विकिलीक्स ही "ना नफा ना तोटा" तत्त्वावर चालणारी प्रभावी आंतराष्ट्रीय संघटना आहे. अमेरिकेचे गुप्त कागदपत्रे प्रसिद्ध करणे - या कार्यामुळे ही संघटना कमी वेळांत जास्त प्रभावी ठरली. अमेरिकेच्या इराकमधील अमानुष कारवाईच्या चित्रफिती या संघटनेने इंटरनेटवर प्रसारित केल्या, त्यामुळे संघटनेस लोकांचा पाठिंबा मिळत राहिला. सरकारी "गुप्त" कागदपत्रे प्रसारित केल्यामुळे असांज हे नेहमीच वेगळ्या वेगळ्या सरकारी यंत्रणेच्या नजरेत असतात.

बाह्य दुवे[संपादन]