विकिलीक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकीलीक्स या पानावरून पुनर्निर्देशित)
विकीलीक्सचा लोगो

विकिलीक्स ही जगभरातील गोपनीय तसेच गुप्त बातम्या प्रसिद्ध करणारी एक वादग्रस्त विना-नफा संस्था आहे. डिसेंवर २००६ मध्ये स्थापन झालेल्या विकीलीक्सने आपल्या संकेतस्थळाच्या द्वारे आजवर लाखो गुप्त व संवेदनशील सरकारी कागदपत्रे, अहवाल व मेमो प्रकाशित केले आहेत. जुलियन असांज हा विकीलीक्सचा प्रमुख संपादक व प्रवक्ता आहे.

विकीलीक्सचा विकिपीडिया किंवा विकिमीडिया फाउंडेशनशी काहीही संबंध नाही.

स्थापना[संपादन]

विकिलीक्स ची स्थापना अंसाज यांनी 4 ऑक्टोबर 2006 रोजी केली. प्रथम "विकी" (कोणी पण संपादित करू शकेल अशी) वेबसाइट 2010 पासून वेगळी करण्यात आली. आधी कोणी पण विकिलीक्स संपादित करू शकत होते, सध्या 2010 नंतर ही प्रणाली बदलण्यात आली आहे. अमेरिकेचे गुप्त कागदपत्रे प्रससिद्ध करणे - या कार्य मुळे ही संगठणा कमी वेळेत जास्त प्रभावी ठरली. अमेरिकेची इराक मधील अमानुष कारवाईचे चित्रफिती या संगठनेने इंटरनेट वर प्रसारित केल्या , त्यामुळे संगठनेस लोकांचा पाठिंबा मिळत राहिला.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • [विकीलीक्स व बातमीस्वातंत्र्य इंग्लिश] (मराठी मजकूर)