Jump to content

जे.एच. पटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जयदेवप्पा हलप्पा तथा जे.एच. पटेल (कानडी:ಜಯದೇವಪ್ಪ ಹಾಲಪ್ಪ ಪಟೇಲ್: १ ऑक्टोबर, १९३०:करीगानुर, मैसूर संस्थान, भारत - १२ डिसेंबर, २०००:बंगळूर, कर्नाटक, भारत) हे भारतातील राजकारणी होते. हे कर्नाटक राज्याचे १५वे मुख्यमंत्री होते. यांचा कार्यकाल ३१ मे, १९९६ ते ७ ऑक्टोबर, १९९९ होता. याआधी ते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री होते.

पटेल १९६७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिमोगा मतदारसंघातून निवडून गेले. पटेल लोकसभेत कानडीतून भाषण देणारे पहिले खासदार होते.