Jump to content

जेलर (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेलर (चित्रपट)
संगीत Anirudh Ravichander
देश भारत
भाषा तमिळ
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}



जेलर हा नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित आणि सन पिक्चर्सच्या कलानिथी मारन निर्मित २०२३ मधील तमिळ-भाषेतील ॲक्शन थरारपट आहे.[] या चित्रपटात रजनीकांत मुख्य भूमिकेत असून विनायकन, रम्या कृष्णन, वसंत रवी, सुनील, मिर्ना मेनन आणि योगी बाबू सहाय्यक भूमिकेत आहेत.

या चित्रपटाची फेब्रुवारी २०२२ मध्ये अधिकृतपणे घोषणा करण्यात आली होती, ज्याचे कार्यरत शीर्षक थलैवर १६९ होते, हा रजनीकांतचा १६९ वा चित्रपट होता, तर अधिकृत शीर्षक जेलर हे जूनमध्ये घोषित करण्यात आले. मुख्य छायाचित्रणाची सुरुवात ऑगस्ट २०२२ मध्ये चेन्नईमध्ये झाली जे जून २०२३ पर्यंत चालले. संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले, तर छायांकन आणि संपादन विजय कार्तिक कन्नन आणि आर. निर्मल यांनी केले आहे.

१० ऑगस्ट २०२३ रोजी जेलरचे प्रदर्शन करण्यात आले. समीक्षकांनी पटकथा लेखन, दिग्दर्शन, कलाकारांचे काम, व्यक्तिचित्रण आणि पार्श्वभूमी संगीताचे कौतुक केले.[] या चित्रपटाने जगभरात ₹४००-५०० कोटींची कमाई केली, ज्यामुळे तो २०२३ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक बनला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Jailer". British Board of Film Classification.
  2. ^ "'Jailer' movie review and release LIVE Updates: Fans reveal Mohanlal's role in the film!". द टाइम्स ऑफ इंडिया. 10 August 2023. 10 August 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 August 2023 रोजी पाहिले.