जेकब सहाय्य कुमार अरुणी
जेकब सहाय्य कुमार अरुणी | |
---|---|
जन्म |
४ जून १९७४ उथमापलयम, तमिळनाडू, भारत |
मृत्यू |
४ नोव्हेंबर, २०१२ (वय ३८)[१] |
जेकब सहाय्य कुमार अरुणी (४ जून १९७४ - ४ नोव्हेंबर २०१२) हे "शेफ जेकब" म्हणून प्रसिद्ध असलेले एक भारतीय सेलिब्रिटी आचारी (शेफ) होते. ज्यांचा जन्म तामिळनाडूच्या उथमापलयममध्ये झाला होता. [२] ते दक्षिण भारतीय खाद्यप्रकारांसाठी प्रसिद्ध होते. जेकब अनेक आघाडीच्या हॉटेल्समध्ये भेट देणारे शेफ आणि भारत आणि परदेशातील काही उत्कृष्ट रेस्टॉरंट्समधील सल्लागार शेफ होते. ते एक समर्पित खाद्य इतिहासकार, मसाला संग्रहक आणि दक्षिण भारतीय पाककला प्रवर्तक देखील होते. [३]
सुरुवातीचे आयुष्य
[संपादन]जेकब अरुणींचा जन्म तामिळनाडूच्या उथमापलयममध्ये डॉक्टर कुटुंबात झाला होता. त्यांची आई विमला मदुरै येथील सीएसआय जयराज अन्नपक्कीम कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये प्राचार्य म्हणून काम करत होती. जेकब यांनी १९९२ ते १९९५ या काळात अमेरिकन कॉलेज, मदुरै येथे भौतिकशास्त्रामध्ये विज्ञान विषयात शिक्षण घेतले. नंतर, आईच्या पाककलेपासून प्रेरित होऊन ते केटरिंगचा अभ्यास करू लागले.
कारकीर्द
[संपादन]अरुणींनी विविध केटरिंग शाळांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले आणि केटरिंग तंत्रज्ञानामध्ये प्रगत पदवी घेतली. नंतर ते कंगेयम येथील चेरानच्या कला विज्ञान महाविद्यालयात केटरिंग विभागाचे प्रमुख झाले आणि त्यानंतर त्याचे मुख्याध्यापक होते. [४] मृत्यू होण्यापूर्वी ते कोयंबटूरच्या साकरा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात केटरिंग विभागाचे संचालक होते.
अरुणींनी प्रदीर्घ वैयक्तिक बार्बेक्यू कुकिंग मॅरेथॉनमधील एक नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला. त्यांनी १४-१५ मार्च २०१० रोजी चेन्नईच्या रेडिसन टेम्पल बे येथे एकूण ४८५ डिशेस (१५० मांसाहारी) बनवण्यासाठी एकूण २४ तास आणि पाच मिनिटे बारबेक्यू केले. बार्बेक्यूवर पूर्वीचे रेकॉर्ड काही शेफ मिळून सादर केले होते, म्हणूनच ते वैयक्तिक बार्बेक्यू रेकॉर्ड बनवणारे पहिले आचारी (शेफ) ठरले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने निवडलेल्या ३ मुख्य आणि २४ उप-न्यायाधीशांच्या समितीने हा कार्यक्रम निश्चित केला. [५]
संदर्भ
[संपादन]- ^ Chef Jacob Sahaya Kumar Aruni dies of heart attack in Chennai IndiaTimes.com, 5 November 2012
- ^ Harsha Koda, harsha@koda.in. "About - Chef Jacob". Chefjacob.in. 13 April 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 April 2011 रोजी पाहिले.
- ^ Shonali Muthalaly (15 March 2010). "Life & Style / Metroplus: Look who's smoking!". The Hindu. 4 April 2011 रोजी पाहिले.
- ^ "Metro Plus Chennai / Gender: Winning flavours". The Hindu. 10 October 2005. 2009-06-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 April 2011 रोजी पाहिले.
- ^ PTI (15 March 2010). "The Hindu: Cities / Chennai: Chennai chef sets world record". Beta.thehindu.com. 4 April 2011 रोजी पाहिले.