जॅक्सन पोलॉक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॅक्सन पोलॉक
Jackson Pollock
जन्म पॉल जॅक्सन पोलॉक
जानेवारी २८, इ.स. १९१२
कोडी, वायोमिंग, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
मृत्यू ऑगस्ट ११, इ.स. १९५६
स्प्रिंग्ज, न्यू यॉर्क
राष्ट्रीयत्व अमेरिकन
पेशा चित्रकार
स्वाक्षरी

जॅक्सन पोलॉक (इंग्लिश: Jackson Pollock) (जानेवारी २८, इ.स. १९१२ - ऑगस्ट ११, इ.स. १९५६) हा एक अमेरिकन चित्रकार होता. अमूर्त अभिव्यक्तिवादी चित्रशैलीमध्ये त्याचे योगदान मौल्यवान मानले जाते. विक्षिप्त व खाजगी स्वभावाच्या व मद्यपानाच्या आहारी गेलेल्या पोलॉकला त्याच्या कारकिर्दीत पुष्कळ प्रसिद्धी व बदनामी मिळाली.

कॅनव्हासावर रंग ओतून चित्रे बनवण्याच्या शैलीमध्ये पोलॉकने नैपुण्य मिळवले होते. इ.स. १९४८ साली त्याने रेखाटलेले क्रमांक ५ ह्या चित्राचे मूल्य सध्या १५.६८ कोटी अमेरिकन डॉलर इतके असून, ते जगातील सर्वांत महागडे चित्र मानले जाते.

बाह्य दुवे[संपादन]