जुलियन असांज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जुलियन असांज
Julian Assange (Norway, March 2010).jpg
जन्म ३ जुलै, १९७१ (1971-07-03) (वय: ४८)
क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया
राष्ट्रीयत्व ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
पेशा पत्रकार, संपादक
प्रसिद्ध कामे विकीलीक्सचा संपादक

जुलियन असांज (इंग्लिश: Julian Assange; जन्मः ३ जुलै १९७१) हा एक ऑस्ट्रेलियन पत्रकार, संपादक व चळवळवादी आहे. असांज हा विकीलीक्स ह्या गुप्त कागदपत्रे इंटरनेटवर प्रकाशित करणार्‍या संकेतस्थळाचा मुख्य संपादक व प्रवक्ता आहे. आजवर असांजच्या नेतृत्वाखाली विकीलीक्सने लाखो गुप्त सरकारी अहवाल, मेमो व संवेदनशील कागदपत्रे खुली केली आहेत. ह्यांमध्ये अमेरिकेच्या इराकअफगाणिस्तानमधील युद्धांबाबत अनेक दस्तावेजांचा समावेश आहे. २८ नोव्हेंबर २०१० रोजी विकीलीक्सने अमेरिकेच्या परराष्ट्रीय खात्याने व जगभरातील अमेरिकन राजदूतांनी लिहिलेली अत्यंत गुप्त अहवाल प्रकाशित करण्यास सुरुवात केली. ह्यामुळे असांजने अमेरिकेसोबत जगभरातील अनेक देशांचा रोष ओढवून घेतला आहे.

आयुष्य[संपादन]

असांज यांचा जन्म क्वीन्सलँड मध्ये झाला. त्यांच्या सावत्र वडिलांच्या म्हणन्यानुसार ते लहानपणा पासूनच हुशार होते, व त्यांना "काय बरोबर आहे व काय चूक आहे" याची जाणीव फार लहान वयात आली होती.

आजवर असांज अनेक देशांमध्ये राहिला आहे. ऑगस्ट २०१० मध्ये स्वीडनने असांजवर एका महिलेचा बलात्कार केल्याबद्दल खटला भरला व असांजला फरारी घोषित केले व असांजला स्वीडनमध्ये परतण्याचा आदेश दिला. ३० नोव्हेंबर २०१० रोजी इंटरपोल ह्या आंतरराष्ट्रीय पोलिस संस्थेने असांजवर अटक वॉरंट लागू केला व ७ डिसेंबर २०१० रोजी त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आले. आपल्यावर बलात्काराचा खोटा आरोप लावला गेला आहे अशी असांजची भुमिका आहे.

विकीलिक्स[संपादन]

असांज यांनी 4 ऑक्टोबर 2006 रोजी विकिलीक्स ची स्थापना केली. विकिलीक्स ही आंतराष्ट्रीय "ना नफा ना तोटा" तत्वावर चालणारी प्रभावी संगठणा आहे. अमेरिकेचे गुप्त कागदपत्रे प्रससिद्ध करणे - या कार्य मुळे ही संगठणा कमी वेळेत जास्त प्रभावी ठरली. अमेरिकेची इराक मधील अमानुष कारवाईचे चित्रफिती या संगठनेने इंटरनेट वर प्रसारित केल्या , त्यामुळे संगठनेस लोकांचा पाठिंबा मिळत राहिला. सरकारी "गुप्त" कागदपत्रे प्रसारित केल्यामुळे असांज हे नेहमीच वेगळ्या वेगळ्या सरकारी यंत्रणेच्या नजरेत असतात.

बाह्य दुवे[संपादन]