Jump to content

जुर शीतल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सणासाठी विशेष भोजन

जुर शीतल हा नेपाळमधील आणि विशेषतः मिथिलेतील नववर्ष स्वागताचा दिवस आहे.[] वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. पूर्वी शितला देवीच्या प्रीत्यर्थ हा उत्सव साजरा केला जात असे. ही देवता कांजिण्या, ताप या आजारांची देवता मानली गेली आहे. हे आजार होऊ नयेत म्हणून तिला प्रार्थना केली जाते.[]

नेपाळखेरीज मिथिला, बिहार या प्रदेशातदेखील हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो. होळीच्या उत्सवासारखेच याचे स्वरूप असते. खाणे, पिणे, नृृृृत्य करणे यातून उत्सवाचा आनंद नागरिक घेतात. मिथिलेतील ब्राह्मण वर्गात या उत्सवाचे विशेष महत्त्व आहे.[]

स्वरूप

[संपादन]
जोरी बारी पदार्थ

१४ किंवा १५ एप्रिल ला हा सण साजरा करण्याची पद्धती प्रचलित आहे.[] या दिवशी मिथिलावासी बारी आणि शिजवलेला भात हे पारंपरिक पदार्थ खातात.[] मिथिला प्रांतातील ब्राह्मण समुदायाचे मैथिली पंचांग आहे. या पंचांगाला अनुसरून त्यांचे सण, उत्सव, प्रथा साजरे केले जातात. जुर शीतल उत्सव हा सुद्धा मैथिली पंचांगानुसारच साजरा केला जातो.[]



संदर्भ

[संपादन]
  1. ^ Aradhya. 600+ Current Affairs MCQs for UPSC Prelims 2020: General Studies Paper-1 (इंग्रजी भाषेत). GRASP IAS.
  2. ^ Contributions to Nepalese Studies (इंग्रजी भाषेत). Institute of Nepal and Asian Studies, Tribhuvan University. 1988.
  3. ^ Maitra, Asim (1986). Religious Life of the Brahman: A Case Study of Maithil Brahmans (इंग्रजी भाषेत). Inter-India Publications. ISBN 978-81-210-0171-7.
  4. ^ "जुड़ शीतल पर्व 14 एप्रिल से शुरू, कुछ इस तरह मिथिला वासी मनाते हैं यह त्योहार". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2024-04-05 रोजी पाहिले.
  5. ^ "The business world's No-Go Days!". 15.4.2020 रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ Mishra, Girish; Pandey, Braj Kumar (1996). Sociology and Economics of Casteism in India: A Study of Bihar (इंग्रजी भाषेत). Pragati Publications. ISBN 978-81-7307-036-5.