जीन ऑगस्टा फेलिसिएन बीकमन
जीन ऑगस्टा फेलिसिएन बीकमन (उर्फ जीन-एमिल) हिचा जन्म ८ डिसेंबर १८९१ रोजी, ब्यूनस आयर्स, अर्जेंटिना येथे झाला. २० एप्रिल १९६३ रोजी लुझने, स्वित्झर्लंड येथे निधन झाले. ही एक बेल्जियन डॉक्टर, समाजवादी, स्त्रीवादी आणि फॅसिस्ट विरोधी होती.[१]
प्रारंभिक जीवन
[संपादन]जीन ऑगस्टा फेलिसिएन बीकमनचा जन्म ८ डिसेंबर १८९१ मध्ये एलिस बीकमन आणि थिओफिल बेकमन यांच्या घरी झाला.[२] एलिस एक स्त्रीवादी पत्रकार होती. थिओफिल एक न्यायशास्त्री होता. जीनने तिच्या आयुष्याची पहिली चार वर्षे अर्जेंटिनामध्ये घालवली. त्यानंतर तिचे कुटुंब बेल्जियमला परत आले. परंतु अर्जेंटिनामध्येच तिच्या पालकांचा घटस्फोट झाला.
शिक्षण आणि वैद्यकीय कारकीर्द
[संपादन]तिने १९०८ ते १९१४ या काळात ब्रुसेल्समध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला. १९२१ मध्ये स्वच्छतेत विशेष प्राविण्य मिळवले. तिने सेंट-पियर हॉस्पिटल आणि नंतर सेंट-जीन हॉस्पिटलमध्ये १९२३ पर्यंत काम केले. ज्यामध्ये पहिल्या महायुद्धाच्या काळात तिने जखमी सैनिकांवर उपचार केले.[२] हॉस्पिटलमध्ये तिने जीन थायसेबर्ट या डॉक्टरशी लग्न केले.
१९२१ ते १९४९ पर्यंत, ती फॉरेस्टच्या पेनटेन्शरी मानववंशशास्त्र सेवेत सामील झाली. पुढे न्यूरोसायकियाट्री, सोशल मेडिसिन आणि क्रिमिनोलॉजी या विषयात विशेष प्राविण्य मिळवले. १९३० च्या दरम्यान, तिने ले बॉन मार्चे स्टोअरच्या वैद्यकीय सेवेसाठी देखील काम केले.
राजकीय कारकीर्द
[संपादन]तिची राजकीय कारकीर्द समाजवादी आणि स्त्रीवादी आदर्शांनी चिन्हांकित झाली. मानवी हक्कांच्या बाजूने आणि फॅसिझमच्या विरोधात तिने लढा दिला.[२]
राजकारणी म्हणून
[संपादन]थायसेबर्टशी घटस्फोट घेतल्यानंतर, बीकमनने ऑक्टोबर १९२७ मध्ये एमिल वँडरवेल्डेशी लग्न केले. वँडरवेल्डेने नंतर तिची बेल्जियन लेबर पार्टीशी ओळख करून दिली. १९३६ मध्ये जेव्हा तो सार्वजनिक आरोग्य मंत्री झाला तेव्हा तिने त्यांच्या कॅबिनेट कार्यालयाची प्रमुख म्हणून काम केले.
१९४६ मध्ये, तिची बेल्जियन सिनेटवर निवड झाली. हे पद तीने १९६३ मध्ये तिच्या मृत्यूपर्यंत सांभाळले.[३]
एक कार्यकर्ता म्हणून
[संपादन]मूलतः तिच्या आईने प्रचलित केलेल्या स्त्रीवादाचा विरोध केला होता. ज्यात तिने स्त्रियांना बळी म्हणून पाहिले होते. नंतर ती स्त्रीवादाची समर्थक बनली. विशेषतः फेडरेशन बेल्गे डेस फेम्स युनिव्हर्सिटायर्स (एफबीएफयु)ची स्थापना करणाऱ्या मेरी डेरशेड-डेलकोर्टच्या प्रभावातून. तिच्या औषध आणि समाजवादी सक्रियतेच्या अभ्यासातून तिला अधिक माहिती मिळाली.[३][२]
पुरस्कार
[संपादन]बेल्जियम, पोलंड आणि इटलीच्या सरकारांनी बीकमनला पुरस्कार दिले.[२]
- नागरी क्रॉस पहिला वर्ग
- नाइट ऑफ द ऑर्डे डी लिओपोल्ड दोन (१९५८)
- नाइट ऑफ द ऑर्डे डेला कोरोन (१९४८)
- सशस्त्र प्रतिकार पदक (१९५६)
- नाइट ऑफ द ऑर्डे पोलोनिया रेस्टिट्युटा
- इटालियन रिपब्लिकच्या ऑर्डर ऑफ मेरिटचा कमांडर
संदर्भ
[संपादन]- ^ https://www.cairn.info/revue-courrier-hebdomadaire-du-crisp-2009-7-page-5.htm
- ^ a b c d e Éliane Gubin; Catherine Jacques; Valérie Piette; Jean Puissant (2006). Dictionnaire des femmes belges (फ्रेंच भाषेत). Bruxelles: Racine. p. 637. ISBN 2-87386-434-6.Éliane Gubin; Catherine Jacques; Valérie Piette; Jean Puissant (2006). Dictionnaire des femmes belges (in French). Bruxelles: Racine. p. 637. ISBN 2-87386-434-6..
- ^ a b Jacques, Catherine (2008). "Militantisme féministe et pouvoir politique : Parcours de deux parlementaires féministes belges (1945-1960)". Amnis (8). doi:10.4000/amnis.641.Jacques, Catherine (2008). "Militantisme féministe et pouvoir politique : Parcours de deux parlementaires féministes belges (1945-1960)". Amnis (8). doi:10.4000/amnis.641.
- CS1 फ्रेंच-भाषा स्रोत (fr)
- इ.स. १९६३ मधील मृत्यू
- इ.स. १८९१ मधील जन्म
- बेल्जियन स्त्रीवादी
- दुसऱ्या महायुद्धातील महिला प्रतिकार सदस्य
- बेल्जियन प्रतिकार सदस्य
- २०व्या शतकातील वैद्य
- महिला चिकित्सक
- पार्टी सोशलिस्ट (बेल्जियम) राजकारणी
- फ्री युनिवर्सिटी ऑफ ब्रसेल्सचे (१८३४-१९६९) माजी विद्यार्थी
- सिनेटचे सदस्य (बेल्जियम)
- बेल्जियन चिकित्सक