प्रणय प्रतीक
Jump to navigation
Jump to search
आविष्कारात्म कलाप्रकारांमधील स्वतःच्या अभिनयातून किंवा अंगभूत सौंदर्यामधून अनेकांच्या प्रणय भावनांना आवाहन करू शकणारी व्यक्ती म्हणजे प्रणय प्रतीक होय. विशेषतः स्त्री-पुरुष अभिनेते, संगीतकार, मॉडेल, किशोरवयातील व्यक्तींचे आदर्श, क्रीडापटू अशा क्षेत्रांतील ख्यातनाम व्यक्ती प्रणय प्रतीक असतात. मूलतः ही संज्ञा १९५० च्या दशकाच्या मध्यात काही हॉलिवूड तारकांच्या, विशेषतः मॅरिलीन मन्रो आणि ब्रिजिट बार्दो या अभिनेत्र्यांच्या संदर्भात वापरली गेली होती.