च्यांग झमिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जियांग झेमिन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
हे चिनी नाव असून, आडनाव च्यांग असे आहे.
च्यांग झमिन (इ.स. १९९७)

च्यांग झमिन (मराठी लेखनभेद: च्यांग झ-मिन, ज्यांग झेमिन, जियांग झेमिन ; चिनी: 江泽民 ; फीनयीन: Jiang Zemin ; ) (ऑगस्ट १७, इ.स. १९२६; यांग्चौ, च्यांग्सू - हयात) हा चिनी साम्यवादी पक्षातील "तिसर्‍या पिढीतला" आघाडीचा राजकारणी होता. तो इ.स. १९९३ ते इ.स. २००३ या कालखंडात चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष होता. त्याआधी इ.स. १९८९ ते इ.स. २००२ या काळात तो चिनी साम्यवादी पक्षाचा सर्वसाधारण सचिव होता.