जाते (धान्य दळणारे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जाते

जाते हे धान्य दळण्याचे एक पारंपरिक साधन आहे. ते दगडाचे असते. यामध्ये दोन जाडजूड दगडी वर्तुळाकार चकत्या असतात. त्या एकमेकांवर एका लाकडी खुंट्याच्या साहाय्याने बसवतात. वरच्या चकतीच्या कडेला एक जास्तीची खुंटी बसवून तिला धरून जात्याची वरची चकती फिरवतात. दोन चकत्यांमध्ये धान्य टाकून जाते फिरवले की धान्याचे पीठ होते. पूर्वीच्या काळी पहाटे घरातील स्त्रिया जात्यावर धान्य दळत दळत ओव्या म्हणत असत. अजूनही काही गावांमध्ये जात्याचा वापर केला जातो.

बहिणाबाई म्हणतात, "ज्यातून पीठ येते, त्याला जाते कसे म्हणावे?" 'ज्याच्यातून 'येतं' पीठ, त्याला 'जातं' म्हणू नये.